Nandini Milk : दुधाच्या विक्री दरात वाढ होणार; सामान्यांना फटका, कर्नाटक सरकारचा निर्णय

Karnataka CM : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल अर्थसंकल्प सादर केला.
Nandini Milk
Nandini Milkagrowon
Published on
Updated on

Karnataka CM : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना भरघोस मदत करत अनेक योजनांचा पाऊस पाडला. दरम्यान अन्नभाग्य योजना लागू झाल्यावर कर्नाटक दुग्ध महामंडळाने नंदिनी दुधाच्या विक्री दरात लिटरमागे पाच रुपयांनी वाढ करण्याची तयारी केली आहे. या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे.

काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारच्या अजेंड्यावर असलेल्या अन्नभाग्य योजना अधिकृतपणे (ता.१०) सुरू करणार आहे. त्यानंतर मंगळवारी (ता. ११) नंदिनीचे (Nandini Milk) संचालक मंडळ मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून राज्य सरकारला दुधाच्या दरात वाढ करण्याची विनंती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रस्तावना मंजुरी देतील या आशेने संचालक मंडळाकडून अंतिम निर्णय जाहीर केला आहे. काल (ता. ६) सायंकाळी केएमएफचे अध्यक्ष भीमा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत दुधाचे दर प्रतिलिटर पाच रुपयांनी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

राज्यातील सर्व दूध संघांनी प्रतिलिटर दुधाचा दर ५ रुपये वाढविण्याची मागणी केली असेल, त्यानुसार केएमएफ शासनाकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठविला आहे. दरवाढीची गरज मुख्यमंत्र्यांना पटवून देण्याचा निर्णय बैठकीत घेतला असून तो लवकरच जाहीर केला जाणार आहे.

Nandini Milk
Budget in Karnataka : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

सरकारची प्रभावी अनुग्रह योजना

अन्नदात्यांचे उत्पन्नाचे स्रोत असलेल्या गायी, म्हशी, मेंढ्या आणि शेळ्यांचा अकाली मृत्यू झाल्यास त्यांना अनुग्रह योजनेंतर्गत मदत देण्याचे सरकारने प्रस्तावित केले आहे. अनुग्रह योजना २०१७ मध्ये लागू करण्यात आली होती. काही कारणांमुळे हा प्रकल्प रखडला होता.

ही योजना पुन्हा राबविण्यात येत असून संसर्गजन्य आजाराने गाय किंवा म्हशीचा मृत्यू झाल्यास १० हजार रुपये आणि शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाल्यास पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत.

त्यामुळे पशुसंवर्धनाला चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या दैनंदिन उत्पन्नाचा स्रोत असलेल्या दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्याचा विचार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com