Karjat APMC : कर्जतला संचालक फुटल्याचे खापर जिल्हाध्यक्षांवर फोडण्याचा प्रयत्न

Karjat News : आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांनी याचे खापर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
NCP
NCPAgrowon

Karjat Taluka Agricultural Produce Market Committee : नगर : कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Karjat APMC Election) निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मत फुटल्याने सभापती आणि उपसभापतिपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले. भाजपचे विधान

परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना दिलेला हा धक्का मानला जात आहे. असे असताना आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांनी याचे खापर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांनी फाळके यांच्या बंगल्याजवळ जाऊन घोषणाबाजी केली आणि भितींवर काळ्या शाईने फुल्या मारत अक्षेपार्ह मजकूर लिहून निषेध व्यक्त केला. जामखेडमध्ये या निवडणुकीवरून भाजपमध्ये शिंदे आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यात वाद झाला. तर कर्जतमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद रंगला आहे.


कर्जत आणि जामखेड कृषी बाजार समितीची निवडणुकीत दोन्ही तालुक्यांत दोन्ही गटांना समान म्हणजे प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या होत्या. जामखेडमध्ये चिठ्ठी टाकून पदाधिकारी निवडण्यात आले. त्यामध्ये भाजपचा सभापती, तर राष्ट्रवादीचा उपसभापती झाला.

NCP
Mumbai APMC : सहकारी संस्थांच्या बैठकीला हवेत ५० टक्के संचालक

कर्जतमध्ये मात्र फेरमतमोजणीची मागणी झाली. फेरमतमोजणीतही निकाल कायम राहिला. कर्जतमधील बाजार समितीत सभापतिपदाची निवड झाली. सभापतिपदाच्या निवडीत राष्ट्रवादीचे एक मत बाद झाले. त्यामुळे भाजपचा सभापती झाला.

निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले काकासाहेब तापकीर सभापती झाले. उपसभापतिपदाच्या निवडणुकीत  राष्ट्रवादीचे एक मत उघडपणे फुटले, त्यामुळे दहा मते घेऊन भाजपचाच उपसभापती झाला.

NCP
Satana APMC : सटाणा बाजार समितीत कांद्याचा ट्रॅक्टर चोरीचा प्रयत्न

या निकालासाठी पवार यांच्या कार्यकर्त्यांनी यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना जबाबदार धरले आहे. फाळके यांच्या बंगल्याला काळे फासण्यात आले.

घोषणा देत बंगल्याच्या भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहीत फाळके यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यामुळे कर्जतमध्ये या निवडणुकीवरून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद पाहायला मिळाला

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com