Junnar APMC News : जुन्नर बाजार समितीचे उमेदवार किशोर तांबे यांचा खून

जुन्नर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोसायटी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आणि तांबेवाडी (ता. जुन्नर) येथील रहिवासी असलेले किशोर तांबे यांचा मुरूम व्यवसायातील स्पर्धेमुळे खून झाल्याचे उघड झाले आहे.
APMC Election
APMC ElectionAgrowon

Pune News जुन्नर बाजार समितीच्या (Junnar APMC Election) निवडणुकीसाठी (Junnar APMC) सोसायटी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आणि तांबेवाडी (ता. जुन्नर) येथील रहिवासी असलेले किशोर तांबे (Kishor Tambe) यांचा मुरूम व्यवसायातील स्पर्धेमुळे खून झाल्याचे उघड झाले आहे. तांबे बुधवारपासून (ता. ५) बेपत्ता झाले होते. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर तांबे हे बुधवारपासून (ता.५) बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचे चुलत भाऊ संतोष तांबे यांनी दिली होती. त्यावरून आळेफाटा पोलिसांनी श्‍वान पथकाच्या साह्याने शोध घेतला असता त्यांचा मृतदेह विहिरीमध्ये असल्याचे निष्पन्न झाले.

APMC Election
Marathwada Apmc Election : बाजार समिती निवडणुकीची रंगत वाढली, आता लक्ष उमेदवारी अर्ज माघारीकडे

या संदर्भात पांडुरंग जिजाबा तांबे (वय ३९, रा. तांबेवाडी) व महेश गोरखनाथ कसाळ (वय ३०, रा. आळेफाटा, ता. जुन्नर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले, की बुधवारी (ता. ५) किशोर तांबे यांना ‘शेतात दारू प्यायला ये,’ असे सांगून बोलावून घेण्यात आले.

APMC Election
Nandurbar Apmc Election Update : नंदुरबारात सहा बाजार समित्यांसाठी छाननीअंती ४६३ अर्ज वैध

शेतात गेल्यानंतर आमच्यात झटापट झाली. किशोर यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह एका पोत्यात घालून विहिरीमध्ये टाकून दिला.

मृतदेह तरंगू नये म्हणून पोत्यात दगडे भरण्यात आली. मुरूम व्यवसायात असलेल्या स्पर्धेमुळे आणि आमची बदनामी करतो, याचा मनात राग धरून खून केला गेला असल्याचेही त्यांनी तपासात सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com