Jotiba Yatra : ‘चांगभलं’च्या गजरात दुमदुमला जोतिबा डोंगर

देशभरातील भाविक उपस्थितीत यात्रेचा मुख्य सोहळा रंगला
Jotiba Yatra
Jotiba YatraAgrowon
Published on
Updated on

राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर : ‘ज्योतिस्वरूपी माझे ध्यान ! ज्योतिस्वरूपी माझे मन ! सदा होई लीन ! ज्योतिर्लिंग माझा देव, त्यांचे चरणी माझा भाव ! ज्योतिरुप अनुभव अंतरीचा... असा भाव मनी ठेवत लाखो भाविकांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. ५) दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या यात्रेचा (Jotiba Yatra) मुख्य सोहळा रंगला.

यात्रेनिमित्त राजदरबारी राजेशाही थाटातील श्रींची बैठी महाअलंकारिक सालंकृत महापूजा बांधण्यात आली. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात खोबऱ्याच्या उधळणात येथील जोतिबा डोंगर न्हाऊन निघाला.


चैत्र यात्रेचा बुधवारी (ता. ५) मुख्य दिवस होता. राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराजे देसाई, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शासकीय पूजा झाली.

कडाक्याच्या उन्हाची तमा न बाळगता हलगीच्या तालावर नाचणारे भाविक व अखंड होणारी गुलाल, खोबऱ्याची उधळण या वातावरणाने डोंगर परिसर मंत्रमुग्ध बनला.

Jotiba Yatra
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला ज्योतिबा डोंगर


चांगभलंच्या गजरात आणि गुलालाची मुक्त उधळण करत मानाच्या सासनकाठ्या दाखल झाल्या.

जोतिबा मंदिरात पहाटे तीनपासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ झाला. पाच वाजता महाभिषेक महापूजा झाली.

दहा वाजता धुपारती सोहळा झाला. हस्त नक्षत्रावर सायंकाळी साडेपाच वाजता श्री जोतिबाचा पालखी सोहळा निघाला.


Jotiba Yatra
Village Life : एका डोंगर माळरानाची सोबत

मानाच्या १०८ सासनकाठ्या नाचविल्या
मंगळवारी सायंकाळी पाडळी (जि. सातारा), विहे (ता. पाटण), किवळ (ता. कराड), कसबे डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), दरवेश पाडळी, मनपाडळे (ता. हातकणंगले), सांगलवाडी (जि. सांगली) यांच्यासह इतर मानाच्या १०८ सासनकाठ्या मूळमाया यमाई मंदिर परिसरात दाखल झाल्या.

त्यांचे स्वागत पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, अधीक्षक दीपक मेहतर आदींनी केले. त्यांना मानाचा विडा दिला.

त्यानंतर या सासनकाठ्या दक्षिण दरवाजातून मुख्य मंदिरात गेल्या. या वेळी ‘चांगभलं’चा जयघोष करत सासनकाठ्या मंदिर परिसरात नाचविण्यात आल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com