Agriculture Irrigation : जामफळ प्रकल्प पुढील वर्षापर्यंत पूर्ण

जामफळ प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, कोणतीही अडचण निर्माण न झाल्यास पुढील वर्षी म्हणजे फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता प्रकल्प सूत्रांनी दिली.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon

Dhule News सोनगीर, जि.धुळे ः जामफळ प्रकल्पाचे (Jamphal Irrigation Project) काम वेगाने सुरू असून, कोणतीही अडचण निर्माण न झाल्यास पुढील वर्षी म्हणजे फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता प्रकल्प सूत्रांनी दिली. त्यामुळे परिसरातील हजारो हेक्टर शेतीला (Agriculture Irrigation) लाभ होईल.

जामफळ प्रकल्पाचे काम २०१९ पासून सुरू आहे. प्रकल्पांतर्गत बुडीत क्षेत्रातील सुमारे ५०० शेतकऱ्यांना शेतीचा मोबदला तीन वर्षे न मिळाल्याने प्रकल्पाचे काम काहीसे मंद होते. शेतकऱ्यांच्या उपोषण व कोरोनामुळे अनेक दिवस काम रखडले. नुकतेच शेतकऱ्यांना पैसे मिळाले असले तरी ते नाराज आहेत. ते न्यायालयात दाद मागणार आहेत.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : डावा कालव्यावरील शेतीला पूर्वीप्रमाणेच पाणी

सर्वांत मोठा प्रकल्प

जामफळ प्रकल्पाची ६.७ टीएमसी पाणी संचयन क्षमता असेल. हा प्रकल्प साठवण प्रकल्प असल्याने सर्व बाजूंची उंची जवळपास समान आहे. प्रकल्पाची परिमिती २२.५० किलोमीटर असून, काठाची उंची ४५ मीटर आहे.

धरणाचा बंधारा पाचशे मीटरहून अधिक आहे. बंधाऱ्यासाठी १८ लाख घनमीटर काळी माती लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून काळी माती मिळत नसल्याने शोध सुरू आहे. ती उपलब्ध झाल्यास कामाचा उरक वाढणार आहे.

जलवाहिनी टाकण्याचे काम वेगात

तापी नदीलगतच्या दभाशी गावापासून जामफळ प्रकल्पापर्यंत सुमारे वीस किलोमीटर अंतर असून, पुढे कुंडाणे, वेल्हाणे व मालेगाव तालुक्यातील कनोलीपर्यंत पाणी पोचविले जाणार आहे. १.७ मीटर व्यासाची सुमारे ३० किलोमीटर मुख्य गुरुत्वगामी जलवाहिनी टाकण्यात आली आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : शेतीच्या सिंचनासाठी पाणीपट्टीचे दर वाढले

तसेच दभाशीपासून प्रकल्पाकडे २.७ मीटर व्यासाची ऊर्ध्वगामी जलवाहिनी सात किलोमीटरपर्यंत टाकण्यात आली असून, काम प्रगतिपथावर आहे. तेवढ्याच व्यासाची जुळी ऊर्ध्वगामी जलवाहिनी टाकण्याचे काम आठ किलोमीटरपर्यंत पोचले आहे.

मुख्य जलनियमन केंद्राचे (एचआर गेट) काम अंतिम टप्प्यात आहे. पंपगृहाचे कामही सुरू आहे. अन्य स्रोतामुळे पाणी धोकादायक पातळीपर्यंत पोचल्यास पाणी बाहेर टाकण्यासाठी कालवा काढण्यात आला आहे.

स्वतंत्र पेट्रोलपंप व खडकांच्या वाळूचा उपयोग

जामफळ प्रकल्पाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांसाठी कंपनीने स्वतःचे स्वतंत्र पेट्रोलपंप निर्माण केले असून, कृत्रिम पद्धतीने खडकांपासून वाळू तयार करून तिचा उपयोग केला जात आहे. प्रकल्पातून जाणाऱ्या भोपाल ट्रान्समिशन कंपनीच्या वीजवाहिनीचे खांब वळविण्यात आले आहेत. वेगाने काम व्हावे म्हणून कारागीर, वाहनचालक व कामगारांना जागेवर जेवण देण्यात येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com