Silk Industry : कारागृहातील कैद्यांना रेशीम उद्योगाचे धडे मिळणार

Sericulture News : पुण्यातील खुल्या कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांना (कच्चे कैदी) शिक्षा पूर्ण झाल्यावर त्यांना समाजात पुन्हा उभे राहता यावे, यासाठी रेशीम उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत.
Silk Farming
Silk FarmingAgrowon
Published on
Updated on

Pune Agriculture Update : पुण्यातील खुल्या कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांना (कच्चे कैदी) शिक्षा पूर्ण झाल्यावर त्यांना समाजात पुन्हा उभे राहता यावे, यासाठी रेशीम उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत.

त्यासाठी राज्याच्या रेशीम उद्योग विभागाने पुढाकार घेतला आहे. ही योजना प्रत्यक्षात राबविण्यासाठी कारागृहाचे अधिकारी यांच्याशी चर्चा सुरू असून, लवकरच हा उपक्रम राज्यातील कारागृहात सुरू होणार आहे, अशी माहिती रेशीम कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

राज्यात तुती लागवडीचा हंगाम जून ते सप्टेंबर आहे. त्याच्या अगोदर बंदीजणांना तुतीच्या बियाण्यांपासून कलमे तयार करणे, कलमांवर रासायनिक प्रक्रिया करणे, कलमे लावण्यासाठी गादी वाफे तयार करणे आणि प्रत्यक्षात कलमांची गादी वाफ्यांवर लागवड कशी करावी, या बाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

त्यानंतर तुती लागवडीच्या कालावधीत कलमे रोपांच्या स्वरूपात तयार होतील त्याची शेतजमिनीमध्ये पट्टा पद्धतीने लागवड कशी करतात याचे प्रात्यक्षिक अधिकारी जागेवरच प्रशिक्षण देतील.

Silk Farming
Silk Industry : पांगरी शिवारातील वादळात रेशीम शेड झाले आडवे

तुतीच्या लागवडीबरोबरच तुतीच्या बागेचे व्यवस्थापन, वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी याची माहिती, चार ते पाच महिन्यांत बाग वाढल्यानंतर रेशीम कीटकांच्या संगोपणाबाबत प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षणानंतर प्रत्यक्षात या रेशीमांची बाजारपेठेत कशी विक्री होते.

त्याला भाव कसा मिळतो, याचीही माहिती अधिकाऱ्यांमार्फत देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे कैद्यांना हा उद्योग शेतकऱ्यासाठी किती महत्त्वाची असून याकडे वळविण्यासाठी त्याच्या कामाच्या अनुभवाचा होणार आहे.

Silk Farming
Silk Business : इंदापुर तालुक्यातील म्हसोबावाडीने मिळवली रेशीम व्यवसायात ओळख

गेल्या अनेक वर्षांपासून खुल्या कारागृहात शिक्षा भोगत असलेले बंदीजन (कच्चे कैदी) यांना रेशीम कोष तयार करण्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर हे कैदी शिक्षा संपल्यानंतर गावी जातील, त्यांना त्यांच्या शेतीमध्ये किंवा इतर ठिकाणी रेशीम उद्योगाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना शेतीमध्ये हा उद्योग सुरू करता येऊ शकतो. त्यामुळे त्यांना अर्थार्जन प्राप्त होऊ शकते हा एक पर्याय उपलब्ध होणार आहे.

- संजय फुले, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com