Eknath Shinde : सरकार आल्यापासून ७० हजार कोटींच्या गुंतवणुकीस मान्यता

यापूर्वीच्या सरकारमध्ये एकमत नसल्याने वेगाने निर्णय होत नव्हते. वजनदार नेत्यांसाठी निर्णय घेतले जात होते. मात्र आमचे सरकार सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon
Published on
Updated on

औरंगाबाद : यापूर्वीच्या सरकारमध्ये एकमत नसल्याने वेगाने निर्णय होत नव्हते. वजनदार नेत्यांसाठी निर्णय घेतले जात होते. मात्र आमचे सरकार सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत सहामाही परीक्षेत आम्ही उत्तीर्ण झालो. वार्षिक परीक्षेत एक नंबरला येऊ. आमचे सरकार आल्यापासून कॅबिनेट सबकमिटीच्या दोन बैठका घेऊन राज्यात ७० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीस (Investment) मान्यता दिली आहे,’’ अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली.

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरतर्फे (मसिआ)तर्फे शेंद्रा, ऑरिक सिटी येथे आयोजित ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३’ चे उद्घाटन उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ५) झाले.

या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ऑनलाइन संवाद साधला. उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, रमेश बोरनारे , प्रदीप जैस्वाल, उदयसिंग राजपूत, उद्योग संचालनालयाचे सचिव हर्षदीप कांबळे, ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकानी, मसिआचे अध्यक्ष किरण जगताप, संयोजक अभय हंचनाळ उपस्थित होते.

Eknath Shinde
Eknath Shinde : ‘मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील’

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. उद्योगांच्या परवानगीसाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आपल्या अडचणी सांगा मार्ग काढू.

आपले राज्य पायाभूत सुविधांमध्ये पुढे आहे. समृद्धीमुळे राज्याचा नाही तर देशाचा देखील फायदा होईल. राज्यात अनेक चांगले प्रकल्प सुरू आहेत. आणखी नवे प्रकल्प सुरू होतील. ऑरिक हे राज्यातील पहिले नियोजित शहर नावारूपाला येत आहे. राज्यात ‘जी २०’ परिषदेची तयारी सुरू आहे. त्या निमित्त विविध कामे होत आहेत.’’

Eknath Shinde
Eknath Shinde : ‘पंदेकृवि’ तील कृषी प्रदर्शनाचे आज मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन

‘‘देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा १५ टक्के वाटा आहे. राज्यात १२ लाख लघु-मध्यम उद्योग आहेत. त्यातून ९४ हजार रोजगार निर्मिती झाली आहे. राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रीलियन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

मराठवाड्याला पुढे नेण्यासाठी सत्तेत येताच नवे धोरण अवलंबले आहे. लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी औद्योगिक वसाहती सुरू करण्याच्या हालचाली होत आहेत. मराठवाडा वैधानिक मंडळे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोवोस येथे उद्योगांसाठी अनेक सामंज्यस करार होतील,’’ असेही शिंदे यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, ‘‘लघु उद्योजकांच्या सगळ्या मागण्या मुख्यमंत्री मान्य करतील. पुढील एक्सो ५० एकर जागेवरील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होईल. बिडकीन येथील फुडपार्कसाठी आचारसंहिता संपल्यावर आठ दिवसांत कुठलीही तारीख द्या, आपण त्याचे उद्घाटन करू. आता छोटे, मध्यम, मोठ्या उद्योगांना ताकद देणे आवश्‍यक आहे.

आम्ही छोट्या उद्योगांना रेड कॉर्पेट देत आहोत. समृद्धी महामार्ग नागपूर ते शिर्डी दरम्यान सुरु झाला आहे. याला ऑरिक, शेंद्रा जोडण्यासाठी ४ हेक्टर जागा संपादित केली आहे. संबंधित शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. त्यामुळे उद्योगांना समृद्धीची कनेक्टिव्हिटी मिळेल.’’

२७ उद्योगांची ५०० कोटींची गुंतवणूक

‘‘शेंद्रा ऑरिकमध्ये २७ उद्योजकांनी ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार केला आहे. त्यांना या कार्यक्रमात ॲलॉटमेंट पत्र देण्यात आले. या गुंतवणुकीमुळे जवळपास दीड हजार तरुणांना रोजगार मिळेल,’’ असे सामंत म्हणाले. डॉ. कराड म्हणाले, ‘‘मराठवाड्यात चार हजार लघु-मध्यम-मोठे उद्योग आहेत.

त्यातून ३ लाख रोजगार मिळाले आहेत. जालना रोडवर २३ किमीचा अखंड उड्डाणपूल प्रस्तावित आहे. त्यासाठी ३ हजार ६०० कोटी रुपये लागतील. तर मेट्रोसाठी ३ हजार २०० कोटी रुपये प्रस्तावित आहेत. चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन करणार आहोत. त्यासाठी ७६४ कोटी रुपये लागतील.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com