Crop Insurance : पीकविमा अर्ज भरताना सर्व्हर डाउनचा आडफाटा

Crop Insurance Nashik : एक रुपयात पिक विम्याचा लाभ देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. मात्र त्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर शेतकरी अर्ज करण्यासाठी जात असताना त्यांना अधिकचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

Nashik News : एक रुपयात पिक विम्याचा लाभ देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. मात्र त्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर शेतकरी अर्ज करण्यासाठी जात असताना त्यांना अधिकचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता.

ही समस्या असतानाच आता पंतप्रधान पीक विमा संकेतस्थळ सर्व्हर डाऊन असल्याने अर्जप्रक्रिया पूर्ण होत नसल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मुदतवाढ मिळावी अशी मागणी होत आहे.

सुरुवातीला एक रुपयांच्या पीकविम्याला ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत खर्च येत असल्याचा प्रकार सर्वात प्रथम ॲग्रोवनने समोर आणला होता.

Crop Insurance
Crop Insurance : नांदेडमध्ये एक रुपयात पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

त्यांनतर ही बाब गांभीर्याने घेत कृषिमंत्री व कृषी आयुक्तांनी तसे पत्र काढून शेतकऱ्यांकडून अधिक पैसे घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचे थेट आदेश दिले. मात्र ही अडचण कमी होते कुठे; तोच तांत्रिक अडचणींचा डोंगर शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

पीक विम्याच्या संकेतस्थळावर अर्जासाठी सर्व तपशील भरले जातात. मात्र पुढील टप्प्यात पीक विमा अर्ज भरण्यासाठी ‘अप्लाय फॉर इन्शुरन्स’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर कुठलीही कार्यवाही पुढे होत नाही.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा नोंदणीला मुदतवाढ अशक्य

त्यात सर्व्हर जाम झाल्याने शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची भीती आहे. गेल्या सप्ताहात शेतकऱ्यांना सलग तीन ते चार दिवस या अडचणीचा सामना करावा लागला होता. त्यातच आता पुन्हा एकदा तांत्रिक अडचणी वारंवार समोर येत आहेत अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने शेतकऱ्यांना या तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

या आहे मुख्य अडचणी

पीक विमा सर्व्हरमध्ये पीक अर्ज पर्याय उपलब्ध होत नाही.

विमा भरण्यासाठी ऑनलाइन सातबारा काढण्यासाठी महसूल विभागाच्या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना अडचणी.

शेतकऱ्याची ओळख पटवण्याकामी आधारची पडताळणी सर्व्हर डाऊन असल्याने वेळेत होत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com