Maharashtra Rain Update : कोकणासह राज्यात पावसाचा जोर ओसरला

Latest Rain Update : कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी झाला आहे. सध्या या भागात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडत आहे.
 Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

Pune News : कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी झाला आहे. सध्या या भागात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. सोमवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंत साताऱ्यातील महाबळेश्‍वर येथे सर्वाधिक १६८.८ मिलिमीटर पाऊस पडला. खानदेश, मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शेतीकामांना सुरुवात झाली असून पश्चिम महाराष्ट्रात भात लागवडीला वेग आला आहे.

मागील काही दिवस घाटमाथ्यावर पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. सध्या दावडी घाटमाथ्यावर २५४ मिलिमीटर, ताम्हिणी २४०, शिरगाव २०५, डुंगरवाडी २०६ मिलिमीटर पाऊस पडला. तर लोणावळा, वळवण, भिवपुरी, कोयना, खोपोली, खांड, भिरा या घाटमाथ्यावर १०० ते २०० मिलिमीटरच्या दरम्यान पाऊस पडला.

कोकणातही पावसाचे प्रमाण कमी झाले असून काही मंडळात १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. या भागातील कुंडलिका आणि जगबुडी या नद्यांनी अजूनही पाणी पातळी इशारा पातळी ओलांडली आहे. तानसा, मोडकसागर, विहार, बारावी या धरणांतील पाणीपातळी वेगाने वाढत आहे. त्यामुळे ही धरणे भरत आली असून तुळशी धरण शंभर टक्के भरले आहे.

 Rain
Kolhapur Rain : पावसाने कोल्हापूरकरांची चिंता वाढवली, अनेक राज्य आणि जिल्हा मार्ग बंद

मध्य महाराष्ट्रातील खानदेशातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत पावसाच्या तुरळक सरी पडल्या. काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून पाणी धोका पातळीकडे वाटचाल करत आहे. कृष्णा खोऱ्यातील अनेक धरणे ५० टक्केपर्यंत भरली आहेत.

मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या भागांत दोन दिवसांपूर्वी जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी शेती खरडून गेली आहे. उर्वरित भागातही पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यांतील काही मंडळात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे ओढे, नाले, नद्या या अजूनही दुथडी भरून वाहत आहेत.

 Rain
Pune Rain Update : पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस

१०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडलेली ठिकाणी : (स्रोत - कृषी विभाग)

धसइ, नयाहडी, सरळगाव १००.८, नेरळ ११८, वौशी ११७.३, कामरली ११७.३, बिरवडी १४०, मालवण १२५.३, पेंडूर ११४.५, म्हापण १२५.३, अमबेरी १२५.३, पोइप १०२, सावंतवाडी, बांदा ११९.८, कणकवली १२४, वागडे १२४, कुडाळ ११३.८, कसाल १००.८, वलवल १२५.३, मानगाव १३०.८, पिंगुळी १४९.५, विक्रमगड १२३, तुर्केवाडी १०७.५, हेरे ११४.३, माले १२१.५, निगुडघर ११३.८, कार्ला १२०.५, लोणावळा १४९.३, वेल्हा १४०, आंबेगाव १३७.३, मोरगिरी १६७.३, हेळवाक १६७.३, तापोळा, लामज १०३.३.

राज्यात मंडलनिहाय पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये : कोकण विभाग : कल्याण ६०, देहरी ७४.५, उल्हासनगर अंबरनाथ, गोरेगाव, कुमभर्ली, बदलापूर ७७, पोयनड ७९.८, चौल, रामरज ७९.८, पवयंजे ७६.३, ओवले, कर्नाळा ६४.८, कर्जत ९२.८, कडाव ८१.८, कळंब ७८.३, कशेले ८०.५, चौक ९२.८, पाली, जांभूळपाडा ७०, आटोने ७४.३, पेण ९४.५, हमरापूर, वशी ८६.५, कसू ७९.८, महाड ५५.८, करंजवडी ६०.३, नाटे ८२.८, खारवली ७८, माणगाव ६२.३, इंदापूर ६८.८, लोणेरे ६४.५, निजामपूर ७१.३, रोहा ६७.३, नागोठणे ६६.३, कोलाड ७५.५, पोलादपूर, कोंडवी, वाकण ६०.३, मुरूड ७३.५, बवरली ७९.८, म्हसला ६८.८, खामगाव ६७.५, मेंढा ८८, चिपळूण, खेर्डी ८४.५,

मार्गताम्हाणे ८३.५, वहाळ ७२.३, सावर्डे ७१, शिर्शी ६८.८, आंबवली, कुळवंडी ७०.८, भरणे ६२.५, दाभोळ ६८.८, धामणंद ८४.५, तळवली, पाटपन्हाळे ७६.५, आबलोली ७२.३, मंडणगड ६७.५, म्हाप्रळ, देव्हारे, कडवई ६३.५, कोंडगाव ८७.८, पाचल ६४.८, मसुरी ९९.५, श्रावण ९९, आचरा ७६.८, आजगाव ६०.५, अंबोली ९६.८, मदुरा ७४.८, वेटोरे ९०.८, कडवल ९८.३, तालवट ९६.८, भेडशी ८९, साखर ६२.८, तळवाडा ९९.३.

मध्य महाराष्ट्र : मुठे ७७.५, भोलावडे ६२.८, खडकाळा ६१.३, पानशेत, विंझर ७५, दहिवड ६१.३, परळी ८९.५, मेढा ६१.५, बामणोली ६२.८, बाजार ६७, आंबा ६६.८, कसबा ६९.५, कडेगाव ९६, कराडवाडी ७३.८, गवसे ९४.८, चंदगड ११४.३, नारंगवाडी ७२.८, माणगाव ७१.३.

मराठवाडा : दहेली ४५.३, सिंदगी ४६.८, माहूर ७५, वानोळा ६२, वाई ५६.५, सिंदखेड ५१.८

विदर्भ : मेहकर ६६, शिवणी रासूलापूर ६८, पापळ ६१, शिरजगाव ५४.८, लोनबेहल ८१.५, सावळी ५१.८, अंजनखेड ८१.५, दारटी ६२, निगनूर ७५, हिवरा ७५, फुलसावंगी ७५, सारवडी ५२.३, सिरोंचा ७८, जिमलगट्टा ५९, कमलापूर ८४.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com