Integrated Pest Management : एकात्मिक कीड नियंत्रण मॉडेल दिशादर्शक

रासायनिक खते व कीटकनाशकांचा वाढता वापर पर्यावरणाला हानिकारक ठरत आहे.
integrated nutrient management
integrated nutrient management Agrowon

Latest Agriculture News : रासायनिक खते (Chemical Fertilizer) व कीटकनाशकांचा (Pesticide) वाढता वापर पर्यावरणाला हानिकारक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) उभारलेले सेंद्रिय निविष्ठा, सेंद्रिय खते, एकात्मिक कीड नियंत्रण, जैविक कीड-रोग व्यवस्थापन शेती पद्धतीचे मॉडेल शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरेल, असे मत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे (नवी दिल्ली) कृषी विस्तार विभागाचे उप महासंचालक डॉ. यू. एस. गौतम यांनी व्यक्त केले.

उप महासंचालक डॉ. गौतम यांनी नुकतीच येथील कृषी विज्ञान केंद्राच्या विविध प्रकल्पांना भेट दिली. या वेळी डॉ. गौतम, डॉ. एस. के. रॉय यांनी केव्हीकेच्या एकात्मिक कीड व्यवस्थापनातील सापळा संग्रहालय, जैविक खते प्रयोगशाळा, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा, वसुंधरा रोपवाटिका, परसबाग, अतिघन आंबा लागवड, आर्या प्रकल्प, गांडूळ खत आदी प्रकल्पांना भेटी दिल्या.

integrated nutrient management
El Nino Impact on Agriculture : एल निनोच्या काळात शेतीसाठी नियोजन कसं कराव?

डॉ. गौतम यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. या वेळी आयसीएआर अटारी झोन-८ पुणेचे संचालक डॉ. एस. के. रॉय, केव्हीकेचे अध्यक्ष अनिल मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, ग्रामोन्नती मंडळाचे सह कार्यवाह अरविंद मेहेर, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत शेटे, डॉ. दत्तात्रेय गावडे, भरत टेमकर, योगेश यादव, निवेदिता शेटे, धनेश पडवळ, वैभव शिंदे, विनोद जाधव, अभिजित केसकर, मध उत्पादक ओंकार चिखले, मशरूम उत्पादक अमर पडवळ, भरडधान्य उद्योजक गणेश सांडभोर, सेंद्रिय निविष्ठा उत्पादक प्रकाश नवले, योगेश मनसुख, सीमा डोंगरे आदी उपस्थित होते.

integrated nutrient management
Sustainable Agriculture : शाश्‍वत शेतीसाठी ‘संजीवक’चा स्वीकार करा

डॉ. एस. के. रॉय म्हणाले, आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी, रागी, राळा, सावा आदी भरडधान्याचा समावेश करणे गरजेचे आहे. प्रत्येक कुटुंबाने विषमुक्त भाजीपाला व फळभाज्या परसबागेमध्ये सेंद्रिय पद्धतीने तयार कराव्यात.’’

डॉ. प्रशांत शेटे यांनी केव्हीकेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन भरत टेमकर यांनी केले. योगेश यादव यांनी आभार मानले.

केव्हीके विषमुक्त अन्न तयार करण्यासाठी जैविक शेती, नैसर्गिक शेती आणि एकात्मिक शेती पद्धतीचा प्रसार करत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी केव्हीके मार्गदर्शन करत आहे.

-अनिल मेहेर, अध्यक्ष, कृषी विज्ञान केंद्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com