Crop Management : एकात्मिक पीक व्यवस्थापनाचा अवलंब करावा ः डॉ. वासकर
परभणी ः ‘‘हवामान बदल, (Climate Change) जमिनीचे आरोग्य, कीड व रोग अशा अनेक नैसर्गिक समस्या (Natural Calamity) शेतकऱ्यांपुढे आहेत. या परिस्थितीत जमीननुसार पीक व वाणांची निवड, एकात्मिक अन्नद्रव्य, कीड-रोग व्यवस्थापन (Disease Management) एकूणच एकात्मिक पीक व्यवस्थापनाचा (Integrated Crop Management) अवलंब केला पाहिजे,’’ असे प्रतिपादन संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे शुक्रवारी (ता.१३) दैठणा (ता. परभणी) तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर शिवारफेरी व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
कृषी अभियंता डॉ. मदन पेंडके, सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, ऋषिकेश औंढेकर, भागवत वाघ आदी उपस्थित होते. भरतराव कच्छवे यांच्या भुईमूग शेतीस, सीताराम कच्छवे यांच्या मिरची लागवड, लक्ष्मीबाई कच्छवे यांच्या जरबेरा फूल शेतीस, इंगळे यांच्या सेंद्रिय शेतीस, अनंत कच्छवे यांच्या पेरूबागेस विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या पथकाने भेट दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.