Micro Irrigation : सूक्ष्म सिंचनाचे प्रस्ताव निकाली काढण्याचे निर्देश

सूक्ष्म सिंचनाचे प्रस्ताव परत करण्यात येत असल्याने वितरक, कंपन्यांचे प्रतिनिधी त्रस्त झाले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची चिन्हे असल्याचे वृत्त बुधवारी (ता. एक) ‘ॲग्रोवन’मध्ये झळकताच यंत्रणेत खळबळ उडाली.
Irrigation Department
Irrigation DepartmentAgrowon
Published on
Updated on

Micro Irrigation Scheme बुलडाणा ः सूक्ष्म सिंचनाचे प्रस्ताव (Micro Irrigation Proposals) परत करण्यात येत असल्याने वितरक, कंपन्यांचे प्रतिनिधी त्रस्त झाले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची चिन्हे असल्याचे वृत्त बुधवारी (ता. एक) ‘ॲग्रोवन’मध्ये (Agrowo) झळकताच यंत्रणेत खळबळ उडाली.

याची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने पत्र काढत तालुका कृषी अधिकाऱ्यांना या बाबत नियमानुसार तातडीने संबंधित प्रस्ताव मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत.

राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब- अधिक पीक’ सूक्ष्म सिंचन २०२२-२३ अंतर्गत जिल्ह्यात योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. परंतु सूक्ष्म सिंचन खरेदी करून त्याचे प्रस्ताव अनुदानासाठी कृषी विभागाकडे पाठविल्यानंतर मोठ्या प्रमाणात परत पाठवले जात आहेत.

यामध्ये जाणीवपूर्वक त्रुट्या काढल्या जात असल्याची चर्चा वितरकांमध्ये जिल्हाभर होती. संपर्क करणाऱ्यांचे प्रस्ताव निकाली लावले जातात.

मात्र इतरांचे प्रस्ताव छोट्या छोट्या कारणासाठी परत केले जात असल्याने सर्व जण त्रासले होते. याचे वृत्त बुधवारी झळकल्यानंतर थेट आयुक्तालयातही याची दखल घेतल्या गेली.

Irrigation Department
Micro Irrigation : सुक्ष्म सिंचन प्रस्ताव मंजुरीच्या मार्गात अडथळे

जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक एस. जी. डाबरे यांनी काढलेल्या पत्रात, ‘‘योजना अंमलबजावणीसाठी केंद्र शासन व राज्य शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचना, आढावा सभा, प्रशिक्षण, दूरध्वनी संदेश इत्यादी माध्यमांद्वारे यापूर्वीच आपणास सुचविण्यात आलेले आहे.

तरी सुद्धा प्रस्ताव परत होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कार्यवाहीचा प्रस्ताव तत्काळ जिल्हा स्तरावर सादर करावा.

Irrigation Department
Agriculture Irrigation : अद्याप जिल्ह्यातील १० लाख हेक्टर क्षेत्र कोरडेच

तथापि संबंधित वितरक, कंपनी यांच्याकडून गैरकृत्य (मार्गदर्शक सूचनेचे उल्लंघन) केल्याचे आढळून आल्यास कार्यवाहीचा प्रस्तावसुद्धा तत्काळ सादर करावा.

या बाबत कुठलीही हयगय केल्यास आपण स्वतः जबाबदार राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

योजनेतील लाभार्थ्यांना विहित वेळेत मार्गदर्शक सूचनेनुसार अनुदान अदा होईल याची खबरदारी घ्यावे’’, असे या पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

‘ॲग्रोवन’ वृत्ताचीच चर्चा

सूक्ष्म सिंचन अनुदानाचे प्रस्ताव परत केल्या जात असल्याचे वृत्त बुधवारी झळकल्यानंतर जिल्हाभर वितरक, कंपनी प्रतिनिधींमध्ये या वृत्ताची समाज माध्यमात मोठी शेअरिंग करण्यात आली. किमान आता तरी यंत्रणा त्रास देणार नाही, अशी अपेक्षा अनेकांनी दूरध्‍वनीद्वारे व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com