Pune News : जलशक्ती अभियान ‘कॅच द रेन’ या अभियानांतर्गत पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करण्याचे व प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्यासाठी विविध उपाययोजना जिल्ह्यात विविध विभागांद्वारे हाती घेण्यात आल्या आहेत.
या अनुषंगाने केंद्र शासनाचे ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव पीयूष सिंग व केरळ येथील केंद्रीय भूमिजल मंडळाच्या अनू वेंकटीरमण यांनी पुणे जिल्ह्यातील पुनर्भरण कामांची पाहणी केली.
क्षेत्रीय पाहणीस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे, भूजल सर्वेक्षण विभागातील वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. एस. गावडे, लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव बोरकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ, गटविकास अधिकारी अनिता पवार, तालुकास्तरीय अधिकारी, तसेच उदाचीवाडी व पिसर्वे ग्रामपंचायतचे सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यामधील सासवड नगर परिषद येथील पुनर्भरण कामाचे, उदाचीवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या पाणीपुरवठा विहिरीचे तसेच पाणीपुरवठा विहिरीलगत अटल भूजल योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या रिचार्ज शाफ्ट कामांची पाहणी केली.
मौजे पिसर्वे येथे अमृत सरोवर योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या पाझर तलावाच्या कामाची पाहणी केली. पाहणीदरम्यान कामाच्या प्रगतीबाबत तसेच असलेल्या लोकसहभागाबाबत श्री. सिंग यांनी समाधान व्यक्त करत, पुढील कामे अभियान कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचनाही केल्या.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.