Orchard Planting : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीची पथकामार्फत तपासणी सुरू

महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेत सलग शेत, बांध किंवा पडीक जमिनीवर फळझाडे, वृक्ष व फुलझाडे लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे.
Orchard Planting
Orchard Planting Agrowon

परभणी : महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee) योजनेअंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेत सलग शेत, बांध किंवा पडीक जमिनीवर फळझाडे, वृक्ष व फुलझाडे लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे. योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याची खात्री करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

त्यासाठी सर्व गट विकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विविध पथके तयार करून जिल्‍ह्यातील फळबाग लागवड कामांची तपासणीही सुरू आहे. विस्‍तार अधिकाऱ्यांनी ही संपूर्ण तपासणी येत्या २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावा. त्‍याबाबतचा अहवाल गट विकास अधिकाऱ्यांना सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Orchard Planting
Crop Protection : ट्रायकोडर्मा वापरण्याच्या विविध पद्धती कोणत्या?

तपासणीसाठी गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकाची गाव पालक अधिकारी म्‍हणून नेमणूक करण्‍यात आली आहे. जिल्‍ह्यातील फळबाग लागवड योजनेअंतर्गत लाभार्थ्‍यांची यादी तयार करताना गट विकास अधिकाऱ्यांनी अंदाजपत्रकानुसार मंजूर झाडांची संख्‍या, त्यांची प्रजाती व प्रत्‍यक्ष लागवड केलेल्या झाडांची संख्या स्पष्टपणे नमूद करावी व त्‍यावर संबंधित लाभार्थ्‍यांना आतापर्यंत मिळालेली रक्‍कम नमूद करत लाभार्थ्यांची स्‍वाक्षरी घेत ग्रामपंचायत स्‍तरावर ती जाहीर करावी.

ही तपासणी करण्‍याचे नियोजन संबंधित गट विकास अधिकारी स्‍तरावर करावे. विस्‍तार अधिकाऱ्यांनी योजनेतील मापदंडानुसार रोपांचे वय, उंची असल्याबाबत खात्री करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्‍पन्न मिळावे यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांनी फळझाडांची निगा राखणे आवश्‍यक आहे. पीक मुदतीपूर्वी काढून टाकल्‍यास शेतकऱ्यांकडून लाभ घेतलेले अनुदान वसुली तर केली जाईलच, सोबतच नियमाप्रमाणे दंडात्‍मक कारवाई करण्‍यात येणार आहे.

केवळ अनुदानासाठी लाभ घेऊ नये....

शेतकऱ्यांनी केवळ अनुदान मिळण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ नये तर शाश्‍वत उत्पन्नासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा प्रशासनाने योजनेतील त्रुटींची गंभीरपणे दखल घेतली असून, त्‍या दूर करण्‍यासाठी तत्काळ योग्‍य ते निर्णय घेण्‍यात येत आहेत. ही योजना शेतकऱ्यांनी शाश्‍वत उत्‍पन्न मिळवून देणारी आहे त्‍यामुळे अमृत महोत्‍सवी फळबाग योजनेचा लाभ घेत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन गोयल यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com