Paddy Farming : रत्नागिरी जिल्ह्यात ऊन-पावसामुळे भातशेतीत किडींचा प्रादुर्भाव

Paddy Pest : राज्याच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात सरासरीपेक्षा २२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे; मात्र मागील आठवड्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गतवर्षीच्या सरासरीत पुन्हा ३२५ मिलिमीटरचा फरक पडला आहे.
Paddy Farming
Paddy FarmingAgrowon
Published on
Updated on

Paddy Crop : रत्नागिरी ः राज्याच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात सरासरीपेक्षा २२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे; मात्र मागील आठवड्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गतवर्षीच्या सरासरीत पुन्हा ३२५ मिलिमीटरचा फरक पडला आहे. हा फरक भातशेतीला त्रासदायक ठरणारा आहे. सध्या दिवसातून एखादी सर पडून जाते, काहीवेळा ढगाळ वातावरण तर ऊन पडत आहे. या वातावरणामुळे भातशेतीवर किडींचा प्रादुर्भाव आणि करपा पडू लागला आहे. हे प्रमाण आटोक्यात असले तरीही भविष्यात त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनच्या चार महिन्यांपैकी अडीच महिन्यांचा कालावधी उलटला असून राज्याच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती समाधानकारक आहे. जूनमध्ये कमी, जुलैत सर्वाधिक तर ऑगस्टमधील पावसाचा प्रवास मध्यम गतीने सुरू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठ दिवस कोरडे जाण्याची शक्यता आहे.

Paddy Farming
Paddy farming : इगतपुरीत पावसामुळे भात शेतीच्या कामांना गती

भात लावणीनंतर वातावरणात झालेल्या बदलांचा परिणाम भात शेतीवर होणार आहे. मागील चार दिवस दुपारी कडकडीत ऊन पडत आहे. दिवसातून एखादी सर येऊन जाते. काही ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण पहायला मिळते. उशिरा आलेल्या मॉन्सूनमुळे भात लावण्या लांबल्या. सध्या जिल्ह्यात भात रोपे लावून वीस ते पंचवीस दिवसांचा कालावधत पूर्ण झाला आहे. रोपांची रुजवात व्यवस्थित झाली असली तरीही त्यांच्या वाढीसाठी पाण्याची गरज आहे. कातळावरील भातशेतीला पाऊस तारू शकतो, अन्यथा रोपे पिवळी पडू शकतात. सध्या रत्नागिरी तालुक्यातील पावस पंचक्रोशीतील काही शेतांत पान खाणारी अळी आढळून आली, तर काही ठिकाणी करप्याचा आढळ आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com