Kaneri Math
Kaneri MathAgrowon

Kaneri Math : कणेरी मठावर मंगळवारपासून देशी जनावरांच्या स्पर्धा, प्रदर्शन

गाय, बैल, अश्‍व, श्‍वान, शेळी, बोकडांचा समावेश, ६९ लाखांची बक्षिसे
Published on

ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील (Kaneri) श्री सिद्धगिरी मठावर आयोजित सुमंगल सोहळ्यात देशी प्रजातींच्या गाय, म्हैस, बकरी, अश्‍व, गाढव, कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

मठावर होणाऱ्या सुमंगल सोहळ्यांतर्गत २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन होईल, अशी माहिती मठाधिपती श्री काडसिद्धेश्‍वर स्वामी यांनी दिली

प्रदर्शनामुळे देशी जातीच्या प्रजातींचे संगोपन व संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होईल. गाढव हा अतिशय उपयुक्त प्राणी असूनही तो दुर्मीळ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर देशात प्रथमच त्यांचे प्रदर्शन भरविण्यात येईल.

प्रदर्शनाबरोबर प्रत्येक जनावरांच्या विविध गटांत भव्य स्पर्धा होतील. त्यासाठी ६९ लाखांची बक्षिसे देण्यात येतील. जनावरांच्या सौंदर्य स्पर्धेत सर्वात सुंदर जनावरांना २१ हजारांपासून ते लाखापर्यंतची बक्षिसे देण्यात येतील.

 Kaneri Math
कणेरी मठावर देशातील पहिले डिव्हाइन गार्डन

पर्यावरण रक्षणाबरोबरच देशी प्रजातींच्या जनावरांचे संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र व राज्य सरकारच्या पशू संवर्धन विभागातर्फे २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान हे प्रदर्शन भरविण्यात येईल.

देशभरातून त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात नावनोंदणी केली आहे. मठावर गोशाळा असून येथे हजारावर गायी आहेत.

नुकतेच येथे भटक्या कुत्र्यांची शाळा सुरू करण्यात आली आहे. सुमंगलम् पंचभूत महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी येतील.

त्यामुळे देशी प्रजातींच्या जनावरांचे भव्य प्रदर्शन हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरेल.

 Kaneri Math
Millet Exhibition : बाजरी भरडधान्यनिर्मित विविध पाककृती स्पर्धा, प्रदर्शन

तीन दिवस होणाऱ्या या प्रदर्शनात गाय, म्हशी, बकरी, घोडे, गाढव, कुत्रे व मांजर यांचा सहभाग राहील. यासाठी भव्य मंडप उभारला आहे.

सर्वोत्कृष्ट गाय आणि बैलाला एक लाखाचे तर म्हैस व रेड्याला ५१ हजाराचे बक्षिस दिले जाईल. मांजर, श्‍वान, शेळी, बोकड यांच्याही स्पर्धा घेतल्या जातील.

देशभरातील विविध जातींचे अश्‍व येथे पाहायला मिळतील. देशी अश्‍व स्पर्धेत प्रथम क्रमांकास लाखाचे बक्षीस देण्यात येईल. प्रत्येक जनावरांमध्ये नर व मादी अशा दोन गटांत बक्षिसे दिली जातील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com