Indian Economy: २०४७ मध्ये भारताचे जीडीपी वीस ट्रिलियनपर्यंत पोहचेल : देबरॉय

भारताचा विकास दर ७ टक्क्यांवरून ८ टक्क्यांपर्यंत वाढवायचा असेल तर राज्यांच्या पातळीवर बरेच संशोधन करावे लागेल. कारण वेगवेगळी राज्ये विकासाच्या वेगवेगळ्या पातळीवर आहेत.
Bibek Debroy's statement on Indian economy
Bibek Debroy's statement on Indian economyAgrowon

भारताचे राष्ट्रीय सकल उत्पन्न (GDP) २०४७ पर्यंत २० ट्रिलियन डॉलरच्या जवळ असेल. तसेच दरडोई उत्पन्न दहा हजार डॉलरवर पोहचू शकेल, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष बिबेक देबरॉय (bibek debroy) यांनी सांगितले. ते बुधवारी (ता.४) हैद्राबाद विद्यापीठ (Hyderabad University) आयोजित इंडियन इकॉनॉमेट्रिक सोसायटीच्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

पुढे ते म्हणाले, "कोविड-१९ साथीची साथ निघून गेली असली तरी आजूबाजूला अनिश्चतेचे वातावरण आहे. चीनमध्ये घडामोडी घडत आहेत.

रशिया-युक्रेन संघर्ष, युरोप आणि यूएसए मधील वाढीची शक्यता यासारख्या जगभरातील काही अनिश्चिततेमुळे भारताला विदेशी चलन बाजार आणि भांडवली बाजार आणि विनिमय दरांमध्ये अस्थिरता दिसू शकते. २०४७ मध्ये भारताचे आजच्या डॉलरच्या मूल्यांचे दरडोई उत्पन्न १० हजार डॉलरवर पोहचेल, असा दावाही देबरॉय यांनी केला.

"भारताचा विकास दर ७ टक्क्यांवरून ८ टक्क्यांपर्यंत वाढवायचा असेल तर राज्यांच्या पातळीवर बरेच संशोधन करावे लागेल. कारण वेगवेगळी राज्ये विकासाच्या वेगवेगळ्या पातळीवर आहेत. त्यामुळे विकासाचे स्रोतही वेगळे असतील.

परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, विकासाचा मार्ग वाढवण्यासाठी आपल्याला मूलभूत बाजारपेठ अधिक कार्यक्षम बनवण्याची गरज आहे. जेव्हा आपण बाजारपेठ अधिक कार्यक्षम बनवू तेव्हा शेतीमध्येही मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल. त्याचप्रमाणे श्रम बाजार आणि भांडवली बाजारही अधिक सक्षम करणे आवश्यक आहे," असेही ते म्हणाले.

ग्रामीण भागात लोकांना मुलभूत गरजा पुरविल्या गेल्या आहेत आणि त्याहूनही अधिक गोष्टी सरकारने केल्या आहेत. भारतात कोविडनंतर आर्थिक निर्देशक सुधारले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com