Indian Sea Products Export : भारताच्या समुद्री उत्पादनांच्या निर्यातीने यंदा गाठला उच्चांक

Indian Export : ८.०९ अब्ज यूएस डॉलरचा टप्पा
Indian See Products Export
Indian See Products ExportAgrowon
Published on
Updated on

Sea Products Export : भारताच्या समुद्री उत्पादनांच्या (सीफूड) निर्यातीने २०२२-२३ या आर्थिक वर्षात ८.०९ अब्ज यूएस डॉलर्स इतका उच्चांक गाठला आहे, असे फेडरल वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने बुधवारी (ता. १४) सांगितले. या कालावधीत सीफूड निर्यात प्रमाणानुसार २६.७३ टक्क्यांनी वाढली आहे.

या कालावधीत, युनायटेड स्टेट्स (यूएस) हा भारतीय सीफूड उत्पादनांचा सर्वांत मोठा आयातदार होता, त्यानंतर चीन, युरोपियन युनियन, आग्नेय आशिया, जपान आणि मध्य पूर्व यांचा क्रमांक लागतो, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

‘मंद मागणीमुळे यूएसला सीफूड निर्यात २१.९४ टक्क्यांनी घसरली, अशी माहिती मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली. सीफूडच्या ५.४८ अब्ज यूएस डॉलर किमतीच्या एकूण निर्यातीपैकी ६७.७२ टक्के वाटा असलेल्या प्रमुख निर्यातीत सीफूड आयटम म्हणून गोठवलेल्या कोळंबीने अव्वल स्थान कायम ठेवले आहे.

दुसरी सर्वात मोठे निर्यात केलेले उत्पादन म्हणजे गोठवलेले मासे, ज्याने ६८७.०५ दशलक्ष यूएस डॉलर्स किंवा एकूण सीफूड निर्यात कमाईच्या ८.४९ टक्के कमाई केली.

या कालावधीत कोळंबीची निर्यात रुपयाच्या मूल्यात १.०१ टक्क्यांनी वाढली असताना, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये गोठवलेल्या कोळंबीची एकूण निर्यात ७.११ लाख टन इतकी होती. २०२२-२३ मध्ये काळा वाघ (बीटी) कोळंबीच्या निर्यातीत अनुक्रमे ७४.०६ टक्के, ६८.६४ टक्के आणि ५५.४१ टक्के वाढ झाली आहे.

Indian See Products Export
Tractor Exports: भारताच्या ट्रॅक्टर उद्योगाने गाठला निर्यातीचा विक्रम

बीटी कोळंबीसाठी जपान ही प्रमुख बाजारपेठ ठरली. आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये वान्नेमी कोळंबीची निर्यात ५२३४.३६ दशलक्ष डॉलरवरून ४८०९.९९ दशलक्ष डॉलर इतकी घसरली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com