Agriculture Machinery Market : भारतीय कृषियंत्रे, अवजारांची बाजारपेठ चीनच्या ताब्यात

कृषी यांत्रिकीकरणात भारत झपाट्याने प्रगती करीत असला तरी त्यातून चीनचे यंत्र निर्माते पोसले जात असल्याची धक्कादायक तक्रार देशी उद्योजक करीत आहेत.
Agriculture Mechanization
Agriculture MechanizationAgrowon

Agriculture Mechanization पुणे ः कृषी यांत्रिकीकरणात भारत झपाट्याने प्रगती करीत असला तरी त्यातून चीनचे यंत्र निर्माते (Machinery Manufacturing) पोसले जात असल्याची धक्कादायक तक्रार देशी उद्योजक करीत आहेत. विशेष म्हणजे, भारतीय उद्योगांचे (Indian Agriculture machinery ) खच्चीकरण करीत आता जवळपास ५३ टक्के बिगर ट्रॅक्टर यंत्रे (नॉन ट्रॅक्टर फार्म मशिनरी) आता चीनमधून येत आहेत.

चीनमधील कृषियंत्रे व अवजारांच्या आयातीची महाकाय लाट वेळीच रोखायला हवी. त्यासाठी देशी उद्योजकांना अधिकाधिक सवलती व शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण अवजारे कमी खर्चात जलदगतीने देण्याची गरज आहे.

हे वेळीच झाले नाही तर येत्या १० वर्षांत भारतीय कृषियंत्रांची बाजारपेठ पूर्णतः चीनच्या ताब्यात जाईल, अशी भीती यंत्र उत्पादन क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

Agriculture Mechanization
Agricultural Mechanization : कृषी यांत्रिकीकरणात राज्याची देशात आघाडी

२०२२ ते २०२७ या कालावधीत चीनमधील कृषियंत्रे उद्योगाच्या विकासाचा दर ५.८ टक्के इतका मजबूत राहण्याची शक्यता आहे.

चीनने शांडोंग, हेनान, जियांत्सू, लिओनिंग आणि जिझियांग या पाच प्रांतांमध्ये तब्बल २५०० कृषियंत्रे निर्मिती प्रकल्प उभारून भारतासह जगातील काही प्रमुख देशांच्या कृषियंत्रे उत्पादक कंपन्यांसमोर मोठी स्पर्धा उभी केली आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे, चीन सरकारकडून तेथील शेतकऱ्यांना अनुदानावर फक्त चीनी उत्पादनेच मिळत होती. २०१९ पर्यंत ही सक्ती लागू होती.

आता ही सक्ती हटविण्यात आली असली तरी चीन सरकारकडून स्थानिक खासगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जात आहेत. यामुळेच चीनी यंत्रे व अवजारे स्वस्तात तयार करून जगभर विकली जात आहेत.

चीन एका बाजूला भारतात कृषियंत्रे व अवजारांची मोठ्या प्रमाणात निर्यात करीत भारतीय बाजारपेठेला काबीज करीत असताना स्वतःची स्थानिक बाजारपेठ अबाधित ठेवण्यासाठी अनुदानाचा मारा करीत आहे.

चीन सध्या ४५ श्रेणींमधील कृषियंत्रांना अनुदान देत आहे. याशिवाय शेतजमीन तयार करणे, लागवड, निविष्ठा वापर यासह शेती व्यवस्थापनातील विविध यंत्रांना अनुदान पुरवीत आहे.

Agriculture Mechanization
Agriculture Mechanization : कृषी यंत्रे, अवजारे वापरात भारत पिछाडीवर

‘चीनला स्वदेशी करातून पोसण्याची चूक’

“कमी मजुरीत मिळणारे अफाट मनुष्यबळ आणि सरकारी मदतीचा ओघ यामुळेच चीनमधील कृषियंत्रे निर्मिती प्रकल्प कमी किमतीत निर्यातीची यंत्रे, अवजारे तयार करतात. भारत सरकारने ही निर्यात रोखण्याऐवजी चक्क या चीन उत्पादित यंत्रे, अवजारांना अनुदानाच्या कक्षेत आणले आहे.

त्यामुळे आपल्याच स्पर्धक विदेशी निर्यातदार देशाला स्वदेशी करातून पोसण्याची चूक केंद्र सरकार करते आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका नामांकित ट्रॅक्टर कंपनीच्या व्यवस्थापकाने व्यक्त केली आहे.

चीन कृषियंत्रांची बाजारपेठ विस्तारण्याची कारणे...

- चीनी उत्पादनावर भारत सरकारकडून अनुदान

- आयात सुटसुटीत होण्यासाठी दिले जाणारे प्रोत्साहन

- चीनमधील स्वस्त मनुष्यबळ व तेथील सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सवलती

- चीनमधील संशोधन संस्था व उत्पादकांमध्ये असलेला समन्वय

- चीन सरकारकडून तेथील सूक्ष्म, लघु, मध्यम श्रेणीतील प्रकल्पांना वेळोवेळी मिळणारी मदत

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com