Zilla Parishad : इंदापूर विकासकामांत क्रमांक एकवर येईल

‘‘जिल्हा परिषदेच्या विविध योजना पंचायत समितीद्वारे नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे.
Zilla Parishad
Zilla ParishadAgrowon
Published on
Updated on

इंदापूर, जि. पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) विविध योजना पंचायत समितीद्वारे नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. तालुक्यात झालेली विकास कामे आदर्शवत आहेत. यामुळे आगामी काळात विकास कामांत जिल्ह्यात इंदापूर तालुका क्रमांक एकवर येईल,’’ असा विश्‍वास पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी व्यक्त केला.

प्रसाद यांनी तालुक्यातील विविध शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय कार्यालये, लाभधारक व उपक्रमांना भेटी दिल्या. यानंतर पंचायत समितीचे सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आयुष प्रसाद बोलत होते.

Zilla Parishad
Agro Idol: स्वत:च स्वत:चे आयडॉल बना

प्रसाद म्हणाले, ‘‘इंदापूर तालुक्याचा अभिमान वाटतो की इंदापूरमध्ये फार चांगले काम चालू आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचा पण वाटा आहे. तसेच तालुक्यातील गायरान जागेत घरकुल मागणी, शेती महामंडळामध्ये घरकुल लाभार्थ्यांची जागेची मागणी आहे. मालमत्ता पत्रकासाठी गावठाण मोजणी हे प्रश्न सोडविण्यासाठी सूचना केली आहे.’

‘तालुक्यातील शासकीय सेवेतील अनेक डॉक्टरांनी नोकरी सोडली आहे. त्यामुळे आरोग्य सेवेला धक्का बसला आहे. तरीही मागील दहा-पंधरा वर्षांपूर्वीचे आकडे पाहिले तर आताच्या आकड्यांमध्ये आरोग्यात सुधारणा झाली आहे. परंतु तुलनेने अजून सुधारणा करण्याची गरज आहे. या बाबत आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. यासह इंदापूरच्या इतिहासात प्रथमच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय होणार आहे. इंदापूरमध्ये शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे. त्या बाबतीत सूचना दिल्या आहेत,’’ असेही प्रसाद म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com