

Nashik Onion Market News : चालूवर्षी उन्हाळ कांदा पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच कांद्याची टिकवणक्षमता संपुष्टात आली आहे.
तसेच बाजारात नेलेल्या कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे कांदा बाजारात लिलावासाठी माल नेला असता त्यात उत्पादन खर्च ही वसूल होत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
संतापलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याने मंगळवारी (ता. १३) वाहनातून विक्रीसाठी आणलेला कांदा मुंबई-आग्रा महामार्गावर मुंगसे (ता. मालेगाव) येथील उपबाजार आवरासमोर ओतून दिला. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
गेल्या वर्षीपासून दराच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी यंदाही अडचणीत सापडल्याची स्थिती आहे. कांद्याचा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे.
अशा परिस्थितीत दरात नावापुरतीच वाढ होते तर पुन्हा घसरण होत असल्याने शेतकऱ्यांचा संयम ढळत आहे.
रस्त्यावर कांद्याने भरलेले वाहने उभे करून कांदे रस्त्यावर ओतल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत आहे. त्यातच वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट यामधून कसाबसा बाहेर पडणारा शेतकरी कांद्याला भाव नसल्याने पुन्हा हतबल झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.