Jaljeevan Mission : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत अवघे ५५ कोटी खर्च

३६६ कोटी ६७ लाख शिल्लक
Jaljeevan Mission
Jaljeevan MissionAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg District News : सिंधुदुर्गनगरी ः जलजीवन मिशनअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या ४२१ कोटी ६८ लाख रुपये निधीपैकी आतापर्यंत अवघा ५५ कोटी १ लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. प्राप्त निधीपैकी ३६६ कोटी ६७ लाख रुपये अखर्चित आहेत.

केंद्र शासनाने पेयजल योजना बंद करून जलजीवन मिशन ही नवीन योजना २०२०-२१ मध्ये सुरू केली. ‘हर घर नल’ हे ब्रीद घेऊन राबविल्या जात असलेल्या योजनेचे प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण ५५ लिटर पाणी उपलब्ध करून देणे हे प्रमुख उदिष्ट आहे. सिंधुदुर्गात ही योजना राबविण्यापूर्वी किती कुटुंबांकडे नळजोडणी नाही याचा सर्व्हे करण्यात आला. यातून जिल्ह्यात १
लाख १८ हजार ५०७ कुटुंबांकडे नळजोडणी नसल्याचे स्पष्ट झाले.

Jaljeevan Mission
jaljeevan Mission : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यासाठी दोन हजार कोटींची तरतूद ः पाटील

या योजना राबविण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली. त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या योजनेचा आराखडा तयार केला. ६६५ योजना राबविण्यासाठी समितीने मान्यता दिली. त्याकरिता ४२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र जूनअखेर केवळ ६८ कामेच पूर्ण झाली आहेत. त्या कामांचा ५५ कोटी १ लाख रुपये निधी खर्च झाला आहे. अजूनही ३६६ कोटी ६७ लाख रुपये अखर्चित आहेत. ही योजना पूर्ण करण्यासाठी मार्च २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Jaljeevan Mission
Jaljeevan Mission : जलजीवन मिशनची कामे प्रलंबित का?

सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे या योजनेची कामे करणे अशक्य आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात कामे करणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर ते मार्च या चार महिन्यांत उर्वरित कामे करण्याचे आव्हान ग्रामीण पाणीपुरवठा विभागासमोर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com