Milk Insurance : उन्हामुळे दूध उत्पादनात घट झाल्यास मिळणार विमा संरक्षण

दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केरळ सहकारी दूध विपणन महासंघाने (मिल्मा) विमा पॉलिसी आणली आहे. या विमा पॉलिसीमुळे दूध उत्पदकांचे होणारे नुकसान भरुन काढण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे.
Milk Insurance
Milk InsuranceAgrowon

भारतातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा दरडोई वाढता वापर, बदलता आहार आणि वाढते शहरीकरण या कारणांमुळे दुधाची मागणी (Milk Demand) वाढली आहे. यातच लम्पी स्किन आजार (Lumpy Skin) आणि कोविड मुळे दुध उत्पादनाला फटका बसला.

त्यामुळे देशात दुधाच्या मागणीत ८-१० टक्के वाढ झाली. दुसऱ्या बाजुला भारतात सध्या उन्हाळा सुरु आहे त्यामुळे दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. वाढत्या उन्हामुळे दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन घटते. त्यामुळे दुध उत्पादकांना  मोठे नुकसान सहन करावे लागते.

अशा परिस्थितीत दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केरळ सहकारी दूध विपणन महासंघाने (मिल्मा) (MILMA) विमा पॉलिसी (Insurance Policy) आणली आहे. या विमा पॉलिसीमुळे  दूध उत्पदकांचे होणारे नुकसान भरुन काढण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे. 

केरळ सहकारी दूध विपणन महासंघाने (मिल्मा)'सरल कृषी विमा' पशुधन विमा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत मिल्मा ने नुकताच अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड (एआयसी) सोबत सामंजस्य करार केला.

एआयसी आणि एआयएमएस इन्शुरन्सच्या सहकार्याने मिल्मातर्फे राबविण्यात येत असलेला हा कार्यक्रम मलबार प्रादेशिक सहकारी दूध उत्पादक संघाचे (एमआरसीएमपीयू) सदस्य असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. अशी माहिती मिल्माच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Milk Insurance
Milk Gujarat: लंपी त्वचा रोगामुळे दूध उत्पादनात घट

वाढत्या तापमानामुळे दूध उत्पादनात लक्षणीय घट होते. ही बाब लक्षात घेऊन या विमा पॉलीसी अंतर्गत सलग सहा दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळ तापमान निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त राहिल्यास पशुपालकांना विमा नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

या योजनेनुसार केरळमधील पलक्कड आणि वायनाड जिल्ह्यात तापमानाची मर्यादा ३७ अंश सेल्सिअस, कन्नूर आणि कासरगोड मध्ये ३४.५ अंश सेल्सिअस, मलप्पुरममध्ये ३३.५ अंश सेल्सिअस आणि कोझिकोडमध्ये ३३ अंश सेल्सिअस ठेवण्यात आली आहे.

Milk Insurance
Milk Production : दूध उत्पादनात घट; मागणीत ७ टक्क्यांनी वाढ

यामध्ये आठ दिवसांपेक्षा जास्त काळ तापमान राहील्यास ४४० रु., १० दिवसांपेक्षा जास्त काळ तापमान राहील्यास ९०० रु. आणि २५ दिवसांपेक्षा जास्त काळ तापमान राहिल्यास २००० रुपये नुकसान भरपाई दिली जाईल, असे मिल्माच्या निवेदनात म्हटले आहे.

पशुपालकांना आपल्या दुग्ध सहकारी संस्थांच्या माध्यमातून नोंदणी करून  या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सॅटेलाइट डेटाचा वापर करून विशिष्ट ठिकाणाचे रेकॉर्ड केलेले तापमान तपासल्यानंतर, पशुपालकांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com