Soybean Sowing : भोर तालुक्यात वाढला सोयाबीन पिकाकडे कल

Kharif Season : तालुक्यात तरकारी पिकांना हमीभाव मिळत नसल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे.
Soybean Sowing
Soybean Sowing Agrowon

Soybean Market : तालुक्यात तरकारी पिकांना हमीभाव मिळत नसल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. तालुक्यात सरासरीच्या १३७ हेक्टरपैकी सुमारे ४८ हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यामुळे तालुक्यात चांगलाच पीक बदल होत असल्याने उन्हाळी हंगामातही उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.

Soybean Sowing
Soybean Market Rate : भारताने आतापर्यंत किती सोयापेंड निर्यात केली?

सोयाबीनचे कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळत आहे. याला हमीभावही चांगला मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात सोयाबीन पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली आहे. सध्या तालुक्यात सोयाबीन पीक जोमात आले आहे. भोर तालुका दुर्गम असल्याने पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते.

Soybean Sowing
Soybean Snail Control : शंखी गोगलगायीला आत्तापासूनच कसं रोखायचं?

मात्र, खडकाळ आणि उथळ जमीन असल्याने पाणी सखोल भागाकडे वाहून जाते. सध्या ठिकठिकाणी कोल्हापुरी पद्धतीचे छोटे बंधारे, तसेच तालुक्याच्या पश्चिमेकडील हिर्डोस मावळ खोऱ्यात नीरा-देवघर धरण झाल्याने पावसाचे पाणी अडविले जात आहे. परिणामी, विहिरी, ओढ्या-नाल्यांना पाणी वाढले आहे. यामुळे तालुक्यात बागायती शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले आहे.

पाणी मुबलक असल्याने शेतकरी बागायती शेतीत तरकारी पिके करू लागले होते. मात्र या पिकांना हमीभाव मिळत नसल्याने तरकारीपेक्षा सोयाबीन उत्कृष्ट असे म्हणत शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे.

सोयाबीन पिकाला पाणी जास्त किंवा कमी झाले तरी त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. कमी कष्टात जास्त उत्पन्न देणारे सोयाबीन हे पीक आहे. यामुळे हे पीक घेणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरत आहे.
- आनंदा खोपडे, शेतकरी, बाजारवाडी, ता. भोर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com