Mangur Fish
Mangur FishAgrowon

Mangur Fish : बेकायदा मांगूर शेतीकडे दुर्लक्ष

आरोग्यासाठी घातक आणि स्थानिक प्रजातींचे मासे नष्ट करणाऱ्या मांगूर मासे पालनाची बेकायदा शेती उजनी पाणलोट क्षेत्रातील अनेक ठिकाणी सुरू आहे.
Published on

Fish Farming इंदापूर, जि. पुणे : आरोग्यासाठी घातक आणि स्थानिक प्रजातींचे मासे नष्ट करणाऱ्या मांगूर मासे (Mangur Fish Farming) पालनाची बेकायदा शेती उजनी पाणलोट क्षेत्रातील अनेक ठिकाणी सुरू आहे.

इंदापूर तालुक्यात याबाबत ठोस कारवाईकडे मत्स्य व्यवसाय (Department Of Fisheries) विभागाकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मत्स्य प्रेमींमधून होत आहे. या माशाच्या कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी इंदापूर तालुक्यात जोर धरत आहे.

Mangur Fish
Mangur Fish : बंदी असलेला मांगूर मासा‘इन्सिनेटर’मध्ये नष्ट करणार

राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातलेल्या व पर्यावरणास घातक असलेल्या मांगूर जातीच्या माशांची बेकायदा शेती केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यात कालठण नंबर १ (ता. इंदापूर) येथील दोन जणांच्या बेकायदा मांगूर पैदास तळ्यातील हजारो किलो मासे नष्ट केले.

ही कारवाई पुणे मत्स्य व्यवसाय विभागाने केली होती. यामुळे अवैधरीत्या मांगूर माशाची पैदास करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मात्र, प्रत्यक्षात या गावांसह परिसरातील गावांमध्ये आजही खुलेआम मांगूरची उत्पत्ती सुरू असल्याचे एका मत्स्यप्रेमीने ''सकाळ''शी बोलताना सांगितले. या व्यवसायावर नियंत्रण नसल्याने, अर्थपूर्ण संबंध तसेच कडक कारवाईचा धाक नसल्याचे हा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना खाद्याचा दुर्गंधीचा त्रास

आक्रमक आणि खादाड प्रवृत्तीचे मांगूर मासे तलाव, नाले आणि धरणसाठ्यातील स्थानिक प्रजातींच्या माशांना फस्त करत आहेत. यामुळे स्थानिक प्रजातींचे मासे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच तलावालगतच्या शेतकऱ्यांना मांगूर माशांच्या खाद्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

Mangur Fish
Mangur Fish : मानवी आरोग्याला घातक मागूर माशांचा साठा जप्त

पर्यावरणाचे प्रदूषण

माशांचे संवर्धन करताना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळण्यासाठी या माशाला कोंबड्यांची घाण, खाण्यायोग्य नसलेले कोंबडीचे मांस, तसेच कत्तलखान्यातील कुजलेले शेळ्या, गाई, म्हशी यांचे मांस खाद्य म्हणून वापरले जाते, यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होत असल्याचे आढळून येते. यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने मांगूर माशांच्या उत्पादनावर व विक्रीवर बंदी घातली आहे.

राष्ट्रीय हरित लवाद आदेशानुसार मांगूर माशांच्या संवर्धनावर कायद्याने बंदी आहे. पर्यावरणासह, आरोग्याला हा मासा हानिकारक आहे. हे माहिती असूनही अशा माशांचे संवर्धन करणारे आणि संबंधितांच्या संवर्धन तलावांवर नियमित कारवाई केली जाणार आहे.

- ए. पी. नाखवा, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com