Sudhir Mungantiwar : मुख्‍यमंत्री व्‍हायचे असेल तर ‘मविआ’तून बाहेर पडा

Nana Patole : नाना पटोले यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर प्रथम त्यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागेल; अशा शब्‍दात वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाना पटोले यांच्‍यावर निशाणा साधला आहे.
Minister Sudhir Mungantiwar
Minister Sudhir MungantiwarAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : बॅनरवर भावी मुख्यमंत्री लिहून कोणालाही मुख्यमंत्री होता येत नाही. यासाठी जनतेच्या हृदयात जागा निर्माण करावी लागते. नाना पटोले यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर प्रथम त्यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागेल; अशा शब्‍दात वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाना पटोले यांच्‍यावर निशाणा साधला आहे.

Minister Sudhir Mungantiwar
Minister Sudhir Mungantiwar : खासगी बँकातून कर्जवाटपाचे प्रमाण कमी

अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने नवी मुंबईत अश्वमेध महायज्ञाचे आयोजन खारघर येथे कारण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन रविवारी (ता. ४) राज्यपाल रमेश बैस आणि कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पार पडले. या वेळी मुनगंटीवार यांनी नाना पटोले यांच्‍या भावी मुख्‍यमंत्रीच्‍या बॅनरवरील फोटोवर प्रतिक्रिया दिली.

Minister Sudhir Mungantiwar
Minister Sudhir Mungantiwar : खरिपात बियाण्यांची टंचाई नकोः सुधीर मुनगंटीवार

...युती कधीही तुटणार नाही

आमची युती ‘अंबूजा’ सिमेंटपेक्षा मजबूत असून आमची युती कितीही तोडण्याचा प्रयत्न केला, तरी ती तुटणार नाही; असे वक्तव्य केले. सोबतच बॅनरवर भावी मुख्यमंत्री यावर आपली प्रतिक्रिया दिली.

नाना पटोले यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर प्रथम त्यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागेल. कारण माहविकास आघाडीमध्ये अनेक लोक मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहत आहेत; अशी टीका केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com