Nagar News : दीडशे विद्यार्थिनींना थंडी-तापाचा त्रास

पैठण येथे मुलींची आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत आदिवासी समाजातील चारशे विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.
Cold Cough
Cold CoughAgrowon

Akole Student Health News : आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत पैठण (ता. अकोले) येथील आश्रमशाळेत सुमारे दीडशे विद्यार्थिनी थंडी-तापाने आजारी पडल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे.

या विद्यार्थिनींवर संगमनेर व लोणी येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आश्रमशाळेस सुटी जाहीर केली आहे.

पैठण येथे मुलींची आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत आदिवासी समाजातील चारशे विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्यासाठी येथे ३२ शिक्षक-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी टप्प्याटप्प्याने दीडशे विद्यार्थिनी थंडी, ताप, उलट्या-जुलाबाने आजारी पडल्या.

Cold Cough
Digital Agriculture : विद्यार्थी डिजिटल शेतीचे धडे गिरवण्यास थायलंडला

त्यांना मुख्याध्यापक व शिक्षकांनी तातडीने कोतूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र काही विद्यार्थिनींची तब्येत खालावल्याने त्यांना लोणी, संगमनेर येथे हलविण्यात आले. त्यामुळे प्रशासन व पालकांची एकच धावपळ उडाली.

ज्या विद्यार्थिनींची तब्येत सुधारली आहे, अशा विद्यार्थिनी आपल्या घरी गेल्या आहेत. काही विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थिनी आजारी पडल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

अधीक्षकाची जागा रिक्त

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय समितीचे या आश्रमशाळेकडे दुर्लक्ष होत आहे. शाळेत स्त्री अधीक्षक नसून, तातडीने ही रिक्त जागा भरावी, असे तत्कालीन प्रकल्प अधिकारी व प्रकल्प समितीला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

Cold Cough
Onion Rate : लासलगावला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले
दोन दिवसांपूर्वी सात-आठ मुलींना थंडी-ताप आल्याने त्यांना औषधोपचारासाठी कोतूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दीडशे मुलींना त्रास झाल्याने त्यांच्यावरही उपचार करण्यात आले. पालकांनी मुलींना घरी नेल्याने सध्या शाळेला सुट्टी देण्यात आली आहे. मात्र काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही.
विष्णू नेहे, मुख्याध्यापक, पैठण आश्रमशाळा
पैठण येथील आश्रमशाळेतील मुलींना थंडी-ताप आल्याने मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने औषधोपचार दिले आहेत. मी स्वतः शाळेला भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली.
राजन पाटील, प्रकल्प अधिकारी, राजूर
माझी मुलगी शोभा ही थंडी-तापाने आजारी असल्याचा मला निरोप मिळला. तातडीने आश्रमशाळेत जाऊन मुलीला उपचारासाठी अकोले येथे नेले. तिच्यावर उपचार सुरू आहे. मात्र प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
पांडुरंग बुधा तांबेकर, पालक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com