Crop Insurance : अमळनेरला पीकविम्यासाठी सहायता कक्ष

Anil Patil Minister : कृषी उत्पन्न बाजार समितीने पीकविमा योजना सहायता कक्ष सुरू करून महाराष्ट्रात आपली छबी उमटवण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन मंत्री अनिल पाटील यांनी बाजार समितीच्या सत्काराला उत्तर देताना केले.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

Jalgaon News : कृषी उत्पन्न बाजार समितीने पीकविमा योजना सहायता कक्ष सुरू करून महाराष्ट्रात आपली छबी उमटवण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन मंत्री अनिल पाटील यांनी बाजार समितीच्या सत्काराला उत्तर देताना केले.

अनिल पाटील यांच्या मंत्रिपदानिमित्त तसेच ५६ व्या वाढदिवसानिमित्त अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांची लाडूतुला करण्यात आली.

वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. यावेळी मोफत प्रधानमंत्री पीकविमा योजना सहायता कक्षाचे उद्घाटन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

ज्या बाजार समितीच्या सभापतीपदावरून आमदार होण्याचे स्वप्न पाहिले, त्या बाजार समितीत मंत्री म्हणून सत्कार स्वीकारताना आनंद वाटतो. बाजार समितीचे व कर्मचाऱ्यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, असे मंत्री पाटील सांगितले.

Crop Insurance
Crop Insurance : साडेपाच लाख शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा

या वेळी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्यांना मोफत पीकविमा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार स्मिता वाघ व भाजपच्या वतीने मंत्री अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविम्यासाठी जादा शुल्काच्या तक्रारी वाढल्या

माजी आमदार साहेबराव पाटील, सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील, संचालक डॉ. अनिल शिंदे, सुषमा देसले, डॉ. अशोक पाटील, समाधान धनगर, पुष्पा पाटील, नितीन पाटील, वृषभ पारेख, प्रकाश वाणी, शंकर बितराई, हरी वाणी, बजरंग अग्रवाल, जितेंद्र जैन, यतीन कोठारी, सचिव डॉ. उन्मेष राठोड, हमाल मापाडी संघटना शरद पाटील, प्रा. सुरेश पाटील, हिरालाल पाटील उपस्थित होते.

नियमित बाजारभाव मिळणार

अमळनेर बाजार समितीतर्फे सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजना सहायता कक्षात शेतकऱ्यांना विविध सुविधा मिळणार आहेत. कुठलेही शुल्क न आकारता शेतकऱ्यांचा पीकविमा फॉर्म अपलोड करणे, शेतकऱ्यांना नियमित बाजारभावाची माहिती देणे, गाळण-चाळण यंत्रणा कार्यान्वित करणे, शेतमाल तारण योजनेला प्रोत्साहन देणे आदी सुविधांचा समावेश आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com