

Nanded News : गेल्या दोन चार दिवसापासून शहर आणि जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली असून गेल्या २४ तासात शुक्रवारी (ता. ७) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १११.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. माहूरला सर्वाधिक ८४.६० मिलिमीटर पाऊस झाला आहे तर कंधार आणि हिमायतनगर तालुक्यात पाऊस झाला नाही.
तसेच हदगाव, भोकर, किनवट, मुदखेड, उमरी आणि अर्धापूर या तालुक्यातही पाऊस चांगला झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून त्यामध्ये किनवट आणि माहूर तालुक्यातील प्रत्येकी दोन मंडळाचा तर हदगाव तालुक्यातील एका मंडळाचा समावेश आहे.
जून महिन्यात पावसाचा पत्ताच नव्हता. दीर्घ विश्रांतीनंतर अखेर जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यापासून पावसाला सुरवात झाली. समाधानकारक पाऊस गेल्या दोन तीन दिवसापासून झाल्यामुळे शेतकरी राजाही सुखावला आहे. मंगळवारी पावसाने सुरवात केली. हा पाऊस जिल्ह्यातील सर्व तालुक्यात झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रखडलेल्या पेरण्यांना सुरवात केली.
दोन दिवसापूर्वी लोहा व बिलोली तालुक्यातील प्रत्येक एका मंडळासह मुखेड तालुक्यातील सहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. त्याचबरोबर आता गेल्या २४ तासात आणखी काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. या पावसामुळे शेत शिवार भिजले असले तरी अजूनही जसा पाहिजे तसा पाऊस बरसला नाही.
तालुकानिहाय २४ तासात झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)
नांदेड ः १०.५०, बिलोली ः ८.७०, मुखेड ः ०.२०, कंधार ः निरंक, लोहा ः १.३०, हदगाव ः ४१.१०, भोकर ः २८.७०, देगलूर ः ०.१०, किनवट ः २९.९०, मुदखेड ः २६.८०, हिमायतनगर ः निरंक, माहूर ः ६४.६०, धर्माबाद ः ३.५०, उमरी ः ३२.६०, अर्धापूर ः २५, नायगाव ः ३.९० मिलिमीटर. चोवीस तासातील सरासरी १५.८० मिलिमीटर. आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी १११.४० मिलिमीटर वार्षिक सरासरीच्या १२.५० टक्के पाऊस झाला आहे.
पाच मंडळात अतिवृष्टी...
दरम्यान, गेल्या २४ तासात जिल्ह्यातील पाच मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामध्ये हदगाव तालुक्यातील आष्टी मंडळात ७४.५० मिलिमीटर, किनवट तालुक्यातील दहेली मंडळात ८९.२५ आणि उमरी बाजार मंडळात ६५, माहूर तालुक्यातील वाई मंडळात ८८ आणि सिंदखेड मंडळात ७०.२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.