Jalgaon Rain : गिरणा पट्ट्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम

Jalgaon Rain Update : गेल्या चार, पाच दिवसांपासून तालुक्यात पावसाला सुरवात झाली आहे. मात्र गिरणा पट्ट्यात पावसाने म्हणावा तसा जोर पकडलेला नाही.
Jalgaon Rain
Jalgaon Rain Agrowon
Published on
Updated on

Monsoon Rain : चाळीसगाव, जि. जळगाव : गेल्या चार, पाच दिवसांपासून तालुक्यात पावसाला सुरवात झाली आहे. मात्र गिरणा पट्ट्यात पावसाने म्हणावा तसा जोर पकडलेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सध्या रिमझिम पाऊस होत असल्यामुळे पेरणी झालेल्या शेतकऱ्यांची पिके सध्या तरली आहेत. तालुक्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

पुरेशा पावसाअभावी अनेक ठिकाणच्या विहिरींनी तळ गाठला आहे. एरवी एप्रिल, मे महिन्यात विहिरी, बोअरवेल आटू लागतात. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा जुलैच्या सुरवातीपर्यंत विहिरींना पाणी होते. मात्र पाऊस लांबल्याने तालुक्यातील भूजल पातळीत घट झाली आहे. त्यामुळे विहिरी, बोअरवेल कोरड्या होऊ लागल्या आहेत. पावसाला विलंब झाल्याने ऐन पावसाळ्यात तालुक्यातील १२ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. दुसरीकडे दमदार पाऊस नसल्याने अनेक ठिकाणी शेतीचे कामे रखडली आहेत. पेरणी होत नसल्याने बी-बियाणे, शेती कामासाठी लागणारे अवजारे, खत, विजेची मोटर आदीची मागणी खुंटली आहे. शेती अवजारे विक्रेत्यांवर अधिकच परिणाम झाले आहे. ग्राहक येत नाहीत. आले तरी एखादा ग्राहक येत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. नुकतेच गिरणा धरणातून पिण्यासाठी शेवटचे आवर्तन सोडण्यात आले. धरणात अवघा १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Jalgaon Rain
Rain Update : धरणक्षेत्रांत जोरदार पावसाची प्रतीक्षा

बारा गावांत टंचाई

तालुक्यातील १२ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला नाही, तर अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा तीव्र होतील. अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत. तालुक्यातील पिंपळगाव, तमगव्हाण, रोहिणी, अंधारी, न्हावे, ढोमणे, राजदेहरे, हातगाव, विसापूरतांडा, कृष्णानगर, करजगाव, शिरसगाव, हिरापूर या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. दीड महिना उलटूनही तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे चिंताग्रस्त बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागून आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com