Rain Update : पावसाचा धुमाकूळ सुरूच

जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. यामुळे सिंचन प्रकल्पात यामुळे भविष्यात सिंचनाची चिंता मिटली आहे. सोबत अनेक गावांत पाणीटंचाई नसेल असे चित्र आहे.
Rain Updates
Rain UpdatesAgrowon
Published on
Updated on

जळगाव ः जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ (Jalgaon Heavy Rain) सुरूच आहे. यामुळे सिंचन प्रकल्पात (Irrigation Project) यामुळे भविष्यात सिंचनाची चिंता मिटली आहे. सोबत अनेक गावांत पाणीटंचाई (Water Shortage) नसेल असे चित्र आहे. जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ८८.५ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे काही मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. तर मोठ्या प्रकल्पांतही ६० टक्क्यांच्यावर पाणीसाठा (Water Storage) आहे.

Rain Updates
Rain Forecast : राज्यात हलक्या पावसाची शक्यता

शुक्रवार (ता.२), शनिवार (ता.३) आणि रविवारी (ता.४) अनेक भागात जोरदार व अतिजोरदार पाऊस झाला. बोदवड, जामनेर, जळगाव, एरंडोल, धरणगाव आदी भागाला पावसाने झोडपले. काही भागात मका, ज्वारी व कापूस आदी पिके जमिनीवर लोळली आहेत. जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. दहा ते वीस जून दरम्यान एक दोन वेळा जोरदार पाऊस झाला. नंतर मात्र चांगलीच ओढ दिली. जुलै महिन्यात मात्र जून महिन्यांच्या पावसाचा बॅकलॉग भरून निघाला. ऑगस्ट महिन्यात पंधरा ऑगस्टला दमदार पाऊस झाला. नंतर तब्बल तेरा दिवसांची पावसाने विश्रांती घेतली. गुरवारी, शुक्रवारी दमदार पाऊस झाला.

Rain Updates
Rain Update : राज्यातील धरणांत ८४ टक्के पाणीसाठा

या पावसाने कपाशीला पावसाच्या रूपाने अमृत मिळाल्याने शेतकरी आनंदित आहेत. पिकांची वाढ होऊन पिके शेंगा लागण्याची स्थिती आहे. जिरायती कपाशीला बोंडे लागण्याची स्थिती आहे. यामुळे पाऊस गरजेचा होता. तो गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही प्रमाणात होत आहे. पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती चांगली आहे.

तळेगावसह परिसराला फटका

तळेगाव (ता. जामनेर, जि.जळगाव) परिसरात खरीप पिकांचे वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. कपाशीसह भाजीपाला पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. परिसरात मका व कापशी पीक भुईसपाट झाले आहे. हातातोंडाशी आलेला उडीद, मूग देखील वाया जाण्याच्या मार्गावर आहे.

तामसवाडी मंडळात वादळी पाऊस

पारोळ तालुक्यातील तामसवाडी मंडळातील ढोली बोळे, वेल्हाणे, तामसवाडी व कराडी परिसरात रविवारी (ता. ४) सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे कापूस पिकांसह इतर पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. परिसरात गेल्या दोन- चार दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यानंतर तालुक्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. ढोली (ता. पारोळा) येथील शेतकरी पांडुरंग रामदास पाटील, संजय राजाराम पाटील, किरण गुमान पाटील, दीपक संतोष पाटील, मदन रामदास पाटील, पांडुरंग छबुलाल पाटील, लोटन वामन पाटील यांच्यासह इतरही अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

धरणनिहाय पाणीसाठा असा

धरण पाणीसाठा

(दलघमी) आताची टक्केवारी गतवर्षीची टक्केवारी

हतनूर २१२.६४ ६९.६५ ३८.३४

गिरणा ३९७.८८ ९७.६१ ६६.०४

वाघूर २३२.१५ ७४.९१ ६६.०४

अभोरा ३१७.६४ १०० १००

मंगरूळ ३३१.५५ १०० १००

सुकी ३७२.१० १०० ९८.०३

मोर ३२३.५५ ८१.८३ ५९.०३

अग्नावती २९५.६० २४.४२ १००

हिवरा २८२.४० २०.०५ १००

बहुळा २५०.१४ ५१.४६ ३६.२३

तोंडापूर ३८५.२० १००.०० ५०.८६

अंजनी २२५.०८ ६८.२४ ४४.१७

गूळ २६७.०९ ८२.१६ ३१.६१

भोकरबारी २३५.३० २४.१६ १६.८४

बोरी २६७.१० १०० १००

मन्याड ३७३.४० ६९.४१ १००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com