Rain Update : मुसळधार पावसाचा दणका सुरूच

पुणे : पूर्व विदर्भात पूरस्थिती कायम; कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर दमदार पाऊस
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : मॉन्सून (Monsoon) सक्रिय असल्याने विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळपासून ढगाळ हवामानासह दुपारनंतर कमी कालावधीत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) पाणीच पाणी होत आहे. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी कोसळत आहे. सततच्या पावसाने खरिपासह, भाजीपाला आणि फळ बागांचे नुकसान होणार आहे.

कमी दाबाचे क्षेत्र(Low pressure area), मॉन्सूनचा आस, किनाऱ्याला समांतर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भ, कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टी होत असून, उर्वरित राज्यातही मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भात पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी सकाळपासूनच कोकण, मध्य महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू होती. पाणलोट क्षेत्रात (Catchment area)सुरू असलेल्या पावसामुळे अनेक प्रमुख धरणांमधून (Dams) पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

पूर्व विदर्भातील भंडारा, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात मंगळवारी (ता.१३) देखील पावसाचा जोर कायम होता. अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाने उघडीप दिली. भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांतील काही मार्ग पूरस्थितीमुळे मंगळवारीही बंद होते. गडचिरोली जिल्ह्यात इंद्रावती नदी धोका पातळीच्या वर वाहत आहे. गोदावरी नदी व वर्धा नदी इशारा पातळीच्या वर वाहत आहे. वैनगंगा नदी व प्राणहिता नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. नागपूर जिल्ह्यातही काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.

नाशिक सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरला आहे. त्यामध्ये सिन्नर, इगतपुरी, चांदवड, नाशिक, दिंडोरी व निफाड तालुक्यांना पावसाने मोठा फटका दिला. आता या भागात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे दिसून आले. पश्चिम भागातील सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. सतत होणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी या पिकांना प्रामुख्याने फटका बसला आहे. पावसाचे पाणी शिवारात साचून राहिल्याने जिल्ह्यात टोमॅटो, कोबी, फ्लॉवर तसेच वेलवर्गीय पिकांमध्ये घेवडा, भोपळा या पिकांचे नुकसान वाढते आहे. यासह कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे, नगर, सातारा जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे.

Rain Update
Soybean Rate : सोयाबीन, मोहरीची वायदेबंदी मागे घेण्याची मागणी | Agrowon | ॲग्रोवन

मंगळवार (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

सावंतवाडी १००, लांजा, मुलदे प्रत्येकी ८०, अंबरनाथ, कुडाळ, मुरबाड, उल्हासनगर, उरण प्रत्येकी ७०, दोडामार्ग, वैभववाडी, राजापूर, माणगाव, कुलाबा प्रत्येकी ६०, वेंगुर्ला, मालवण प्रत्येकी ५०.

मध्य महाराष्ट्र :

गगनबावडा ११०, चंदगड ९०, पौड, राधानगरी प्रत्येकी ७०, पन्हाळा, जळगाव, धानोरी, शाहूवाडी प्रत्येकी ५०, यावल, आजरा, कोल्हापूर, पुणे, सिंदखेडा रावेर प्रत्येकी ४०, गारगोटी, राजगुरुनगर, दहिगाव, कागल, धडगाव, मुक्ताईनगर, महाबळेश्वर, गिधाडे, भुसावळ, अमळनेर, बोधवड, राहता प्रत्येकी ३०.

मराठवाडा :

भोकर, माहूर प्रत्येकी ८०, हिमायतनगर, बिलोली प्रत्येकी ६०, अर्धापूर, हदगाव, बदनापूर, किनवट, धर्माबाद प्रत्येकी ५०, पूर्णा, घनसांगवी प्रत्येकी ४०, खुलताबाद, पाटोदा, नायगाव, मंथा, मुदखेड, नांदेड, अंबड, उमरी, सोनपेठ, वसमत प्रत्येकी ३०.

विदर्भ :

भंडारा १८०, गोंदिया, नागपूर प्रत्येकी १३०, गोंदिया १००, कुही, हिंगणा प्रत्येकी ८०, पवनी, लाखनी, अर्वी, काटोल प्रत्येकी ७०, तिरोडा, खारंघा, सेलू, मोहाडी, साकोली, आष्टी, भिवापूर प्रत्येकी ६०, वर्धा, नरखेडा, उरमेड, कोर्ची, सालकेसा, कामठी, देवळी, धानोरा, तुमसर, वरूड प्रत्येकी ५०.

Rain Update
Tur Import : आफ्रिकेतून तूर आयात का वाढतेय?

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com