Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांचे ग्रहण संपता संपेना

नियमित शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्ज व ऑगस्ट महिन्यापर्यंत व्याजाइतकी रक्कम तसेच थकबाकीदार व बिगर कर्जदार शेतकऱ्याला हेक्टरी २० हजार ४०० अनुदान देण्यात आले होते.
Havey Rain Loss
Havey Rain LossAgrowon

कळमसरे : अतिवृष्टीमुळे २०१९ मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईला (Crop Damage) ग्रहण लागले आहे. चार महिन्यांपासून मदत येऊनही नियमित कर्ज फेडणाऱ्या (Loan Repayment)बाधित शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. अनुदान (Subsidy) मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

शासनाच्या निर्णयानुसार नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना १ हेक्टर साठी घेतलेले कर्ज शासनाकडून देण्यात आलेले आहे. परंतु या शासन निर्णयाचा स्थानिक अधिकारी यांनी चुकीचा अर्थ काढून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २० हजार ४०० प्रमाणे वाटप केले आहे.

त्यामुळे नियमित कर्जदार शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यापूर्वीही नियमित शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्ज व ऑगस्ट महिन्यापर्यंत व्याजाइतकी रक्कम तसेच थकबाकीदार व बिगर कर्जदार शेतकऱ्याला हेक्टरी २० हजार ४०० अनुदान देण्यात आले होते.

शेतकरी दररोज तालुक्यावर चकरा मारत आहेत. म्हणून किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पिरन पाटील व तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन देऊन अनुदान मिळण्याची मागणी केली. '

त्यानुसार जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी कोणताही पात्र बाधित शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही असे पत्र तहसीलदाराना दिले आहे.

Havey Rain Loss
Mechanization Subsidy : यांत्रिकीकरणाचे अनुदान लवकरच मिळणार

विशेष म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ४० गावांचे नुकसान झाले होते. त्यांना साडेतीन वर्षे वाट पाहावी लागली. २०२० - २१ मध्ये झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळून गेले आहे.

दरम्यान, आता गेल्या चार महिन्यांपासून अनुदान येऊनही बँक खात्यावर जमा होत नसल्याने शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com