Rain Forecast : काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत

राज्यात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
Crop Harvesting
Crop HarvestingAgrowon

Pune Rain News पुणे : राज्यात हवामान खात्याने (Weather Department) पावसाचा अंदाज (Rain Forecast) वर्तविल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

येत्या चार ते पाच दिवसांत पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पक्व झालेल्या हरभरा, गव्हाची काढणी (Wheat Harvesting) करून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यात काही भागांत पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र या भागात गारपिटीची शक्यता नाकारली आहे.

Crop Harvesting
Rabi Crop Harvesting : रब्बीतील पिकांच्या काढणीचा जोर वाढला

गेल्या आठवड्यातही पावसाने चांगलाच दणका दिला. त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. तर कृषी विभागाकडे सुमारे २० हेक्टरचे नजर अंदाजाद्वारे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. त्यातच पुन्हा पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती आहे.

Crop Harvesting
Rain Forecast : उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

एकीकडे काही दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचा पारा ३५ अंशावर वर गेला आहे. येत्या चार दिवसांत हवामानामध्ये सातत्याने बदल होण्याची शक्यता आहे.

१५ ते १७ मार्चपर्यंत दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज (ता.१६) शहरातील वातावरण अंशतः ढगाळ राहील. मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. शुक्रवार (ता. १७) पर्यंत अंशतः: ढगाळ वातावरण राहील.

बळीराजाची चिंता वाढली

वातावरणातील बदलामुळे काही दिवसांपूर्वी ऐन उन्हाळ्यात शहरात पावसाने हजेरी लावली. आता पुन्हा तीन दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गेल्या आठ दिवसांपूर्वी एका दिवसाच्या पावसाच्या हजेरीने पिकांच्या नुकसानीने शेतकरी चांगलेच अडचणीत आले. आता पुन्हा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे..

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com