GST Department : सांगलीतील १० खत कारखान्यांवर जीएसटी विभागाची मोठी कारवाई

Central GST Department : केंद्रीय जीएसटी विभागाच्या कार्यालयाकडून मागच्या २०२२ साली सांगली जिल्ह्यातील १० खत कारखान्यांवर छापा टाकला होता.
GST Department
GST Departmentagrowon

Fertilizer Factories in Sangli : केंद्रीय जीएसटी विभागाच्या कार्यालयाकडून मागच्या २०२२ साली सांगली जिल्ह्यातील १० खत कारखान्यांवर छापा टाकला होता.

दरम्यान या छाप्याची कारवाई पूर्ण झाली असून खत कारखान्यांवर कारवाईसाठी नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे, कोल्हापूर सांगली विभागातील केंद्रीय जीएसटी विभागाने छापे टाकले होते.

यामध्ये खते, सूक्ष्म मूलद्रव्ये तसेच प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचे उत्पादन करणाऱ्या दहा खत कारखाने व त्यांच्या कार्यालयावर एकाच वेळी छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली होती. या तपासणीत संबंधित कारखानदारांनी कोट्यवधींचे उत्पादन शुल्क चुकविल्याची बाब समोर आली होती.

फेब्रुवारी २०२२ मध्ये ही कारवाई करण्यात आली होती यामध्ये खत कारखान्यांनी ८ कोटींचे उत्पादन शुल्क कर चुकवला होता. यावर जीएसटी विभागाने कारवाई केल्यावर तुमच्याकडून दंड का आकारू नये असे म्हणून ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

GST Department
Hodi Spardha Kolhapur : कोल्हापुरातील पंचगंगा नदीपात्रात होड्यांच्या स्पर्धेचा थरार, PHOTOS

कोल्हापूर येथील केंद्रीय जीएसटी कार्यालयात याबाबत नुकतीच सुनावणी झाली. या सुनावणीत सांगली जिल्ह्यातील दहा खत कारखानदारांना केंद्रीय जीएसटी विभागाकडून न भरलेले केंद्रीय उत्पादन शुल्क सुमारे आठ कोटी त्यावरील व्याज व दंड भरण्याचे आदेश प्राप्त झाल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.

या कारवाईच्या दरम्यान काही खत कारखानदारांनी सुमारे एक ते दीड कोटी रुपये कर भरणा केला असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com