sandeep Shirguppe
कोल्हापूर जिल्ह्यातील रूई येथील पंचगंगा नदी पात्रात काल (ता.०७) स्वातंत्र्य दिनानिमीत्त होड्यांच्या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या, यावेळी अत्यंत चुरशीने या स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेसाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकून १३ होड्या आल्या होत्या. सांगलीवाडीच्या तरूणांच्या होडीने पहिला क्रमांक पटकावला.
पंचगंगा नदीवरील रूई बंधाऱ्यापासून १ किलोमीटरपर्यंत अंतर ठेवण्यात आले होते. होड्या सुटलेल्या ठिकाणापासून ते अंतिम ठिकाणापर्यंत झेंड्यांच्या स्वरूपात निशाणी लावण्यात आल्या होत्या.
जवळपास ४ राऊंड मारताना होड्यांच्यामध्ये जोरदार पहिल्या तीन नंबरसाठी जोरदार चढाओढ पहायला मिळाली.
एकूण पाच ते ६ किलोमीटरचा असणारा हा मार्ग स्पर्धकांची शारीरिक आणि मानसिक ताकद अजमावणारा होता.
यामध्ये सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी, समडोळी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, कवठेसार या भागातील होड्या मोठ्या प्रमाणात होत्या.
पहिल्या फेरीपासून सांगलीवाडीच्या होड्यांनी जी आघाडी घेतली होती ती शेवटपर्यंत तशीच ठेवली. तर काही इचलकरंजीच्या होड्यांनी जोरदार प्रयत्न केले.
दरम्यान या स्पर्धेत भाग घेणारा वर्ग हा जवळपास २० ते ३० वयोगटातील असावा लागतो. तर यातील सुकाणू हा अत्यंत हुशार आणि चपळ असावा लागतो.
याचबरोबर होडीवर बसणाऱ्या तरूण शक्यतो लग्न न झालेले असावे लागतात आणि र्निव्यसनी असावा लागते.
जवळपास १ तास आपल्या शरिराचा कस लावणाऱ्या तरूणांचा थरार नदी पात्रात पहायला मिळतो. हजारो लोकांची मने जिंकण्यासाठी तरूण होड्या अत्यंत ताकदीने आणि कौशल्याने चालवत असतात.