Agriculture Processing : जांभूळ प्रक्रियेला मोठ्या संधी

वैद्यकीयदृष्ट्या जांभूळ पिकाला महत्त्व येत असून, त्याचे नवनवीन वाण विकसित होत आहेत. तसेच जांभूळ प्रक्रियेलादेखील मोठ्या संधी आहेत.
Narayangaon KVK
Narayangaon KVKAgrowon

Fruit Processing पुणे ः वैद्यकीयदृष्ट्या जांभूळ पिकाला (Rose Apple) महत्त्व येत असून, त्याचे नवनवीन वाण (Rose Apple Verity) विकसित होत आहेत. तसेच जांभूळ प्रक्रियेलादेखील (Rose Apple Processing) मोठ्या संधी आहेत.

जांभळाचे पीक सेंद्रिय पद्धतीने करता येणे शक्य आहे. यासाठीचे प्रयोग विद्यापीठात सुरू असून, शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करावा, असे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर यांनी केले.

जांभूळ बागाईतदार संघ आणि कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला राज्यस्तरीय जांभूळ पीक परिसंवाद कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव (पुणे) येथे आयोजित करण्यात आले होते.

या परिसंवादाला राज्यातील १४ जिल्ह्यातील व गुजरातमधील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता व संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत शेटे अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे, गृहविज्ञान विषयतज्ज्ञ निवेदिता शेटे, उद्यान विद्या विषयतज्ज्ञ भरत टेमकर, जांभूळ बागाईतदार संघाचे पदाधिकारी उपाध्यक्ष मच्छिंद्र झोडगे, महादेव बरळ, सचिव दिनेश भुजबळ, खजिनदार संपतराव कोथिंबीर, संचालक जालिंदर बोराटे, संचालक ज्ञानेश्वर झोडगे उपस्थित होते

Narayangaon KVK
Food Processing : आता सगळे हवे ‘इन्स्टंट’

डॉ. हळदणकर म्हणाले, ‘‘आरोग्याचा आधारवड असलेल्या व दुर्लक्षित असलेल्या जांभळाचे आरोग्याच्या दृष्‍टीने महत्त्व वाढत आहे. या फळाची शेती सेंद्रिय पद्धतीने यशस्वी होऊ शकते यासाठीचे प्रयोग विद्यापाठीत सुरू आहेत,’’ असेही त्यांनी सांगितले.

जांभळाच्या उन्नत जाती, या फळासाठी जमीन कशी असावी, लागवडीचे योग्य अंतर कोणते, छाटणी तंत्रज्ञान, फुलोरा येण्यासाठी ताण व्यवस्थापन कसे करायचे, कीड व रोग नियंत्रणासाठी जैविक उपाययोजना, खत-पाणी व्यवस्थापक याविषयीची सविस्तर हळदणकर यांनी यावेळी दिली.

Narayangaon KVK
PM Food Processing Scheme : नंदुरबारमध्ये मोबाईल व्हॅनचा प्रारंभ

गृहविज्ञान विषयतज्ज्ञ निवेदिता शेटे यांनी जांभूळ पीक प्रक्रियेबद्दल माहिती दिली. यामध्ये त्यांनी जांभूळ ज्यूस, पल्प, जॅम, टॉफी, वाइन व बियांपासून पावडर कशी बनवायची याची सविस्तर माहिती दिली.

औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहतीमधील फ्रोझन (शीतकरण) प्रक्रियातज्ज्ञ संदीप गायके यांनी जांभूळ फ्रोझन प्रक्रियेची माहिती दिली. तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीने प्रतिभा अडागळे यांनी प्रक्रिया उद्योगाला मिळणाऱ्या अनुदानाविषयी माहिती दिली.

या परिसंवादास पुणे, नगर, बीड, बुलडाणा, वाशीम, सोलापूर, सातारा, नाशिक, जालना, लातूर, सूरत येथील २०० पेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले होते. तसेच प्रगतिशील शेतकरी उत्तम भगत, दीपक साकोरे, सूरत येथील पार्थ जोशी, शीतल देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी संघाचे घोषवाक्य व बोधचिन्हाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

परिसंवाचे प्रास्ताविक अध्यक्ष राजेंद्र तोडकरी यांनी केले. सूत्रसंचालन संचालक ज्ञानेश कुटे यांनी केले. आभार प्रदर्शन सहसचिव प्रवीण येवले यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com