Leopard Attack : बिबट्याच्या जबड्यातून नातवाने सोडविले आजोबांना

कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील आनंदवल्ली शिवारात बिबट्याने गंगाधर वाळीबा ठाकरे (वय ७६) यांच्यावर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले.
Bibtya Attack
Bibtya AttackAgrowon

Leopard Attack News नगर ः कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील आनंदवल्ली शिवारात बिबट्याने (Leopard Attack) गंगाधर वाळीबा ठाकरे (वय ७६) यांच्यावर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले.

दरम्यान, ठाकरे यांच्या नातवाने बिबट्यावर बॅटरीचा प्रकाश टाकत दगडांचा मारा केल्याने त्याने धूम ठोकली. नातवाच्या प्रसंगावधानामुळे आजोबांचे प्राण (Leopard Terror) वाचले. जखमी गंगाधर ठाकरे यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धामोरी येथील आनंदवल्ली शिवारात गंगाधर ठाकरे यांचे घर आहे.

कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील आनंदवल्ली शिवारात दोन दिवसांपूर्वी पहाटे अडीचच्या सुमारास बिबट्याने वस्तीवर प्रवेश करत गायींच्या गोठ्यात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फसला. त्यानंतर त्याने बाहेर बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला केला.

कुत्र्याचा आवाज आल्याने गंगाधर ठाकरे बाहेर आले. त्यांनी समोर बिबट्या पाहिल्यावर त्याला काठी फेकून मारली. त्यामुळे कुत्र्याला सोडून बिबट्याने ठाकरे यांच्यावर हल्ला केला.

Bibtya Attack
Leopard Attack : कांदा चाळीचे कुंपण तोडून बिबट्याकडून कालवड फस्त

तसेच त्यांच्या शरीराचे लचके तोडले. बिबट्या ठाकरे यांचा गळा जबड्यात पकडण्याच्या तयारीत असतानाच त्यांचा आवाज आल्याने त्यांचा नातू ज्ञानेश्‍वर हे बाहेर आले. त्यांनी आजोबांच्या छातीवर बसलेल्या बिबट्याला पाहिले.

Bibtya Attack
Leopard Attack : चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

प्रसंगावधान दाखवत त्यांनी बिबट्यावर दगडांचा मारा केला. त्यामुळे चिडलेल्या बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला केला. त्यात त्यांच्या पायाला जखम झाली. अखेर ज्ञानेश्‍वर ठाकरे यांनी हातातील बॅटरीचा प्रकाशझोत बिबट्याच्या डोळ्यावर टाकला. त्यामुळे बिबट्याने गंगाधर ठाकरे यांना सोडून पळ काढला.

वनविभाग असंवेदनशील

कुत्र्याला आजोबाने, तर आजोबांना नातू ज्ञानेश्‍वर यांनी वाचवले. धामोरी परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून, शिवरात्रीच्या दिवशी बिबट्याने एका गायीवर हल्ला केला होता. उपचारादरम्यान या गायीचा मृत्यू झाला. याबाबतची कल्पना देऊनही, वनविभाग गंभीर नसल्याची खंत ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com