Grampanchyat Election : सरंपचानंतर आता कौन बनेगा उपसरपंच?

जळकोट तालुक्यातील १३ गावांत उत्सुकता
Grampanchyat Election
Grampanchyat ElectionAgrowon

जळकोट, ता. २७ ः तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणूका (Grampanchyat Election ) पार पडल्या, निकालही लागला. सरपंच (Sarpanch) थेट जनतेतून निवडले गेले. त्यामुळे आता उपसरपंच पदाच्या निवडी गावपातळीवर होणार असून सरपंचानंतरचे महत्वाचे पद असल्याने कौन बनेगा उपसरपंच? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून उत्सुकता वाढली असल्याचे चित्र आहे.

Grampanchyat Election
Grampanchyat Election : उपसरपंच निवडीत सरपंचाला मत देण्याचा अधिकार

नव्या नियमाप्रमाणे थेट जनतेने केलेल्या मतदानातून सरपंच निवडले गेले. त्यामुळे सरपंच निवडीत होणारी सदस्यांची पळवापळवी, रस्सीखेच यावेळी नाही. त्यामुळे ती उत्कंठाही नाही. सरपंच व सदस्यांच्या मतदान निकालानंतर निकाल लागला त्यानंतर जल्लोष, सत्कार आदी पार पडले. आता उपसरपंच निवडीची उत्सुकता लागली आहे.त्यासाठी प्रशासनामार्फत कार्यक्रम तयार करण्यात येणार असून पुढील आठवड्यात नववर्षात या निवडी होण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपसरपंच निवडले जाणार असल्याचे नायब तहसीलदार राजाभाऊ खरात यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Grampanchyat Election
Grampanchyat Election : ग्रामपंचायतीत धक्कादायक निकाल

या निवडी सदस्यांसोबत सरपंचांना एक मत देण्याचा अधिकार आहे. यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. कोणीही नाराज होऊ नये यासाठी प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. गावोगावी आता इच्छुकांनी ''फिल्डिंग'' लावली आहे. गावात एका पॅनलला बहुमत असेल तर सर्वांनी कोणाला संधी द्यायची हे ठरवून निवड होणार आहे. उपसरपंचपदासाठीचे बहुमतासाठी आवश्यक सदस्य संख्या यासाठी राजकारणही रंगणार आहे.

तालुक्यातील करंजी, उमरदरा, केकतसिंदगी, होकर्णा, चेरा, लाळी खर्द, हावरगा, उमरगा रेतु, गुत्ती, माळहिप्परगा, पाटोदा बुद्रुक, जगळपूर या गावात निवडणूका पार पडल्या असून उपसरपंच कोण होणार? याची चर्चा या गावागावातील नागरिकात रंगत आहे. ग्रामपंचायतीत सरपंचानंतर उपसरपंचपद प्रतिष्ठेचे मानले जात असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यादृष्टिने ग्रामपंचायत प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. सरपंचपद निवडीनंतर आता उपसरपंच कोण होणार याबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सुकता दिसून येत असून उपसरपंचपदासाठी सदस्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा गावपातळीवर हालचालींना वेग आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com