Atal Bhujal : ‘अटल भूजल’अंतर्गत ग्रामपंचायतस्तरीय क्षमता बांधणी कार्यक्रमास प्रारंभ

भूजल पातळी खालावण्याचा गंभीर वेग, वार्षिक उपलब्धतेच्या तुलनेत वार्षिक भूजल उपसा अधिक होणाऱ्या गावांत केंद्र शासनाच्या अटल भूजल योजनेंतर्गत ग्रामपंचायतस्तरीय क्षमता बांधणी कार्यक्रमास १३ जिल्ह्यांत सुरुवात झाली आहे.
Atal Bhujal Scheme | Atal Bhujal
Atal Bhujal Scheme | Atal Bhujal Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
सातारा : भूजल पातळी खालावण्याचा गंभीर वेग, वार्षिक उपलब्धतेच्या तुलनेत वार्षिक भूजल उपसा अधिक होणाऱ्या गावांत केंद्र शासनाच्या अटल भूजल (Atal Bhujal) योजनेंतर्गत ग्रामपंचायतस्तरीय (Grampanchyat) क्षमता बांधणी कार्यक्रमास (capacity building programme ) १३ जिल्ह्यांत सुरुवात झाली आहे. नुकत्याच सुरू झालेल्या या कार्यक्रमांत ‘अतिशोषित पाणलोट’ क्षेत्र श्रेणी गटातून ‘सुरक्षित पाणलोट’ क्षेत्र श्रेणीत येण्यासाठी सारे गाव एकत्र आणून उपाययोजना करण्याचा निर्धार गावागावांत आयोजित पहिल्या प्रशिक्षणांमधून व्यक्त होत आहे.

Atal Bhujal Scheme | Atal Bhujal
Atal Bhujal Scheme : दीड लाख नागरिकांमध्ये होणार ‘अटल भूजल’ची जनजागृती

अटल भूजल योजनेंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जीएसडीए) यांच्या मार्गदर्शनाखाली सिमासेस लर्निंग (SIILC) या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून या प्रशिक्षण उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे.

गावचे ग्रामपंचायत मंडळ, प्रमुख नेते, शेतकरी गटांचे प्रतिनिधी, पाणीवापर संस्थांचे प्रतिनिधी, विहीर मालक, कूपनलिका मालक, शेतकरी महिला गटांचे सदस्य आदी ग्रामपंचायतस्तरीय घटकांची गावातील जलसुरक्षा आराखडा राबवणे, तसेच वार्षिक जलअंदाज पत्रक बनवण्याबाबत क्षमता बांधणी करण्याचा उद्देश या प्रशिक्षणामागे आहे.

Atal Bhujal Scheme | Atal Bhujal
Atal Aahar : अटल आहार योजनेचे अवघे ९०० लाभार्थी

२०२२-२३ वर्षात राज्यातील १३ जिल्ह्यांतील ४३ तालुक्यांतील १९३३ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर ६ प्रशिक्षणे होणार आहेत. अटल भूजल योजनेतील पंचसूत्रीची अंमलबजावणी गावच्या जलसुरक्षा आराखड्याची अंमलबजावणी, गावचे वार्षिक जल अंदाजपत्रक (पाण्याचा ताळेबंद मांडण्याची प्रक्रिया) जलसुरक्षा आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी शासकीय योजनांचे समन्वय, शेतात तसेच घरगुती पातळ्यांवर पाणी बचतीच्या उपाययोजना, सूक्ष्म सिंचनाचा अवलंब लोकसहभाग पद्धतीने गावच्या भूजल संपदेचे शाश्वत व्यवस्थापन, जलसंवर्धन, व्यवस्थापनासाठी गावस्तरावर व्यापक संवाद धोरण राबवणे जलव्यवस्थापनात शेतकरी कंपनी पाणीवापर संस्थेची भूमिका.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com