Nandurbar Z. P. : जि.प. विषय समिती सभापतींचे खातेवाटप जाहीर

जिल्हा परिषदेच्या सत्तांतरानंतर गुरुवारी (ता. ३) पहिलीच सर्वसाधारण सभा झाली. त्यात विविध विषय समिती सभापतींना खातेवाटप व समिती सदस्य निवड जाहीर करण्यात आली.
Zilla Parishad
Zilla Parishad Agrowon

नंदुरबार ः जिल्हा परिषदेच्या (Nandurbar Z. P.) सत्तांतरानंतर गुरुवारी (ता. ३) पहिलीच सर्वसाधारण सभा झाली. त्यात विविध विषय समिती सभापतींना खातेवाटप व समिती सदस्य निवड जाहीर करण्यात आली. त्यात उपाध्यक्ष सुहास नाईक यांना बांधकाम व आरोग्य, हेमलता शितोळे यांना कृषी व पशुसंवर्धन, गणेश पराडके यांना शिक्षण व वित्त, संगीता गावित यांना महिला व बालकल्याण, तर शंकर पाडवी यांच्याकडे समाजकल्याण सभापतिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. सभेत जाहीर करण्यात आलेल्या विषय समिती व सभापतींच्या समित्या वाटपात काहीसा घोळ झाल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा बैठक घेऊन नव्याने जबाबदाऱ्या सोपविल्या.

Zilla Parishad
Cotton Rate : कापूस दरात सुधारणा

मागील महिन्यात १७ ऑक्टोबरला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची निवडणूक झाली. त्यानंतर २० ऑक्टोबरला सभापती निवडीसाठीची प्रक्रिया पार पडली. त्यात विविध विषय समिती सभापतिपदाची जबाबदारी निश्‍चित करणे व त्या समित्यांच्या सदस्यांची निवड बाकी होती. त्यासाठी जिल्हा परिषदेत गुरुवारी सकाळी अकरापासून सदस्यपदासाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्या प्रक्रियेनंतर दुपारी दोनला अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या वेळी उपाध्यक्ष सुहास नाईक, सभापती संगीता गावित, हेमलता शितोळे, गणेश पराडके, शंकर पाडवी मंचावर उपस्थित होते. तसेच सत्ताधारी भाजप व विरोधी काँग्रेस-शिवसेनेचे काही सदस्य उपस्थित होते.

Zilla Parishad
Soybeans Market : सोयाबीन बाजारातील स्थिती काय?

प्रत्येक समितीसाठी आवश्‍यक असलेल्या सदस्यांएवढेच अर्ज आल्याने सदस्यांची निवड बिनविरोध पार पडली.

सुहास नाईक ः

बांधकाम व आरोग्य

हेमलता शितोळे ः

कृषी व पशुसंवर्धन

गणेश पराडके ः

शिक्षण व वित्त

संगीता गावित ः

महिला व बालकल्याण

शंकर पाडवी ः समाजकल्याण

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com