Crop Damage
Crop DamageAgrowon

Crop Damage Compensation : शेतकऱ्यांना मदतीपोटी ६२४ कोटी देण्यास मंजुरी

Crop Damage Compensation Update : र्च, एप्रिलसाठी २२२, तर गेल्या वर्षीचे ४०१ कोटी

ॲग्रोवन वृत्तसेवा
Crop Damage : मुंबई : २०२१ आणि २०२२ च्या वर्षांत झालेल्या गारपीट आणि अवेळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले. तसेच यंदा मार्च व एप्रिलमध्ये पिकांना अवेळी पावसाचा तडाखा बसला.

या नुकसानीसाठी ६२४ कोटी ३६ लाख ३४ हजार रुपयांची मदत वितरणास मान्यता देण्यात आली आहे.

मागील वर्षी पावसाळ्यातील नुकसानीसाठी ४०१ कोटी ७० लाख, ७० हजार रुपये, तर मार्च आणि एप्रिलमधील नुकसानीपोटी २२२ कोटी ६५ लाख ३४ हजार रुपये मदत मंजूर केली आहे. शेतकऱ्यांना त्याचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे.

राज्यात गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे केले होते. मात्र कोरोनाचे कारण देत मदत देण्यात चालढकल करण्यात आली होती. नुकसान भरपाई

मागील वर्षीच्या पावसात पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची मदत म्हणून ४०१ कोटी ७० लाख ७० हजार रुपये वितरित करण्यात येतील. ही मदत ‘एनडीआरएफ’च्या निकषांनुसार करण्यात आली आहे.

यामध्ये पिके, अतिवृष्टीने बाधित झालेल्या कुटुंबांना कपडे, भांडी, घरगुती सामान, मृत जनावरे, कोंबड्या आदींसाठी मदत दिली जाईल. तसेच पडझड झालेली घरे, बारा बलुतेदार, मत्स्य व्यावसायिकांना मदत करण्यात येईल.


अमरावती विभागात २९३ कोटी १० लाख ८७ हजार इतकी सर्वाधिक मदत दिली जाईल. त्याखालोखाल नाशिक विभागात ९० कोटी ५० लाख ५३ हजार रुपये मदत दिली जाईल. कोकण विभागात ३१ लाख ६१ हजार, पुणे विभागात सात लाख ५१ हजार, औरंगाबाद विभागात सात कोटी १७ लाख ५९ हजार रुपये वितरित करण्यात येतील.

पिकांच्या नुकसानीपोटी ३९१ कोटी १८ लाख ११ हजार, मृत जनावरांच्या भरपाईपोटी २ कोटी १० लाख २० हजार, गोठे, घरे पूर्णत: पडलेल्यांना २ कोटी ५७ लाख ६७ हजार, तर मत्स्य व्यावसायिकांना ३० लाख ३२ हजार रुपयांची मदत देण्यात येईल.

 Crop Damage
Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्त बाधित शेतकऱ्यांना ७३ कोटी रुपये नुकसान भरपाई

मार्च आणि एप्रिल महिन्यांत वादळी पावसाने पिकांचे नुकसान झाले होते. नाशिक विभागात सर्वाधिक नुकसान झाले होते. या नुकसानीची मदत म्हणून राज्य सरकारने २२२ कोटी ६५ लाख ३४ हजार रुपये वितरणास मान्यता दिली आहे.

यामध्ये नाशिक विभागास सर्वाधिक म्हणजे १५८ कोटी ८३ लाख ८ हजार रुपये वितरित करण्यात येतील. ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून देण्यात येत असली, तरी एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले शेतकरी या मदतीस पात्र असतील.

जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले, तेवढ्या क्षेत्राकरिता दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येईल. नाशिक पाठोपाठ अमरावती विभागाला ४३ कोटी ३० लाख ५१ हजार रुपये, नागपूर विभागाला ११ कोटी ८७ लाख ३ हजार, तर पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्याला ३ कोटी १९ लाख ४२ हजार रुपयांचे वितरण करण्यात येईल.

 Crop Damage
Crop Damage Compensation : मार्चतील नुकसानीस नागपूर, कोकण विभागाला २७ कोटी

थोडक्यात महत्त्वाचे...
- मागील वर्षीसाठी अमरावती विभागाला २९३ कोटी १० लाख ८७ हजार इतकी सर्वाधिक मदत मिळणार. त्याखालोखाल नाशिक विभागाला ९० कोटी ५० लाख रुपये मदत.


- मार्च, एप्रिलमधील नुकसानीसाठी नाशिक विभागास सर्वाधिक १५८ कोटी ८३ लाखांची मदत
- मार्च, एप्रिलमधील मदतीसाठी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले शेतकरी पात्र


- जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले, तेवढ्या क्षेत्राकरिता दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत

नाशिक, जळगावला सर्वाधिक मदत
वितरित करण्यात येणाऱ्या मदतीत नाशिकमध्ये ८० कोटी २२ लाख ६० हजार, जळगावमध्ये २६ कोटी ६५ लाख, धुळ्यात ४ कोटी ५१ लाख ८० हजार, नंदूरबार येथे ५० लाख १२ हजार रुपयांचे वितरण करण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com