Palavi Industries
Palavi IndustriesAgrowon

Palavi Industries : पालवी इंडस्ट्रीजच्या प्रकाश सापळ्यांना भारत सरकारचे पेटंट

कीड नियंत्रणासाठी उत्तम पर्याय ः सुदर्शन हेरले


ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः येथील पालवी इंडस्ट्रीज (Palavi Industries) आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) केंद्रीय उपोष्ण बागवान संस्थेच्या वतीने संशोधित लाइट ट्रॅप (Light Trap) या उत्पादनास भारत सरकारच्या पेटंट (Patent) कार्यालयाकडून नुकतेच पेटंट देण्यात आले आहे. सौरऊर्जाचलित एक एकर आणि विद्युतचलित एक हेक्टर या प्रकारातील ट्रॅपना पेटंट मिळाले आहे. यामुळे आता रससोषक (Sucking Pest) किडी व शत्रू किडीच्या पतंगाच्या नियंत्रणासाठी हे सापळे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, अशी माहिती, पालवी इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन हेरले यांनी दिली.

Palavi Industries
Fertilizer Subsidy : संयुक्त खतांच्या अनुदानात कपात

श्री. हेरले म्हणाले, की भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या उपोष्ण बागवान संस्थेच्या आणि आमच्या कंपनीच्या वतीने लाइट ट्रॅप हे उत्पादन विकसित आणि संशोधित केले आहे. २०१७ पासून या उत्पादनाच्या संशोधनावर ‘पालवी‘चे काम सुरू होते. २०१९ मध्ये केंद्रीय उपोष्ण बागवान संस्थेच्या सहकार्यातून आणि अधिक संशोधनातून हे उत्पादन विकसित केले. गतवर्षी कृषी परिषदेने आम्हाला उत्पादन आणि त्याची विक्री करण्याची परवानगी दिली. आता या उत्पादनाला पेटंट मिळाल्यामुळे त्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

Palavi Industries
Cotton Rate : कापसाच्या दरात सुधारणा का झाली?

सौरऊर्जाचलित एक एकर (आयसीएआर ट्रॅप २) आणि विद्युत चलित एक हेक्टर (आयसीएआर ट्रॅप ३) या दोन प्रकारच्या उत्पादनांना पेटंट दिले आहे. पालवी इंडस्ट्रीजच्या वतीने या दोन मॉडेलसहित लाइट ट्रॅप प्रकारात एकूण पाच मॉडेल्स विकसित केले आहेत. सौरऊर्जा व विद्युतचलित प्रकारचे हे सर्व सापळे आहेत. एक एकर व एक हेक्टर परिसरातील किडींचे नियंत्रण करण्यासाठी हे ट्रॅप उपयुक्त आहेत. याशिवाय कलर चेंजिंग मॉडेलही विकसित केले आहे. या मॉडेलमध्ये वेगवेगळ्या रंगातील लाइटच्या तीव्रतेसह हे सुरू असतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या किडी याकडे आकर्षित होतात आणि त्यांचे नियंत्रण होते.

Palavi Industries
Soybeans Market : सोयाबीन बाजारातील स्थिती काय?

सर्व ट्रॅप स्वयंचलित आहेत. सूर्यास्तानंतर ट्रॅपमधील ऑपरेटिंग सिस्टीमनुसार हे कार्यान्वित होतात. रात्री उशिरा मित्र कीटकांची संख्या वाढण्यास सुरू झाल्यानंतर ते आपोआप बंद होतात. या प्रकाश सापळ्यांच्या वापरामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होणार आहे. केमिकल अंशविरहित पिकांचे उत्पादन यामुळे शक्य होईल आणि निर्यात वाढीस चालना मिळेल. कीटकनाशकांच्या वापरामुळे मित्र किडीही मरतात. सापळ्यांच्या वापरामुळे मित्र किडी वाचतात, याशिवाय उत्पादन खर्चातही बचत होते. पालवी इंडस्ट्रीजच्या वतीने सध्या विविध प्रकारचे प्रकाश सापळे संपूर्ण भारतभरासह इटली, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकन देशात निर्यात केले जातात. दापोली कृषी विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या आमच्या किंग कॅचर या प्रकाश सापळ्यासही देशभरात मोठी मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com