Soil And Water Conservation : माती, पाणी जपणाऱ्या गावांना चांगले दिवस

Popatrao Pawar : मातीत मोठी ताकद आहे. माती माणसाच्या मूळ जगण्याचा प्रश्‍न आहे. त्यामुळे माती आणि पाणी जपले पाहिजे.
Popatrao Pawar
Popatrao PawarAgrowon
Published on
Updated on

Nagar News : ‘‘मातीत मोठी ताकद आहे. माती माणसाच्या मूळ जगण्याचा प्रश्‍न आहे. त्यामुळे माती आणि पाणी जपले पाहिजे. ज्या गावांनी माती आणि पाणी जपले, त्याच गावाला पुढील काळात भविष्य असेल,’’ असे मत पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रंगभूमी मीडियातर्फे नगर येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयात शुक्रवारी (ता. ९) कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे होते. या वेळी ‘लोकआवाज’चे संपादक विठ्ठल लांडगे, मंगेश बदर, भूषण गणुरकर, रंगभूमी मीडियाचे कृष्णा बेलगावकर आदी उपस्थित होते.

Popatrao Pawar
Pratap Pawar : काही प्रथा आणि परंपरा...!

पवार म्हणाले, ‘‘समाजातील चांगले काम पुढे आले पाहिजे. पर्यावरणाबाबत मोठी समस्या तयार झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना पर्यावरणवर मोठे काम केले. चित्रपटाबाबत लोकांना आकर्षण आहे. अनेक अभिनेते पर्यावरणावर काम करतात. असे चित्रपट समाजाला चांगले संदेश देतात

. ग्रामीण माणसाचा माती, पाण्याशी सबंध असतो. पाणी, माती जपली नाही तर पुढील ५० वर्षांत पाण्याची स्थिती गंभीर होईल. २०५० मध्ये पुरेसे अन्न मिळेल की नाही याबाबत शंका आहे. देशातील ३५० जिल्ह्यांत याबाबत चिंतन केले जात आहे.’’

Popatrao Pawar
Popatrao Pawar : एकोप्यातूनही आदर्श गावाची उभारणी : पोपटराव पवार

‘‘पैशाने काही बदल होत नाही. त्यासाठी श्रम हवे असतात. आज देशात व्यसनाधीनता वाढत आहे. आजाराची संख्या वाढली. संस्कार कमी आहेत. महाराष्ट्रातील तरून समाजाचे भविष्य आहेत. त्यामुळे तरुणांनी पर्यावरणाचा विचार करण्याची गरज आहे.’’

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे कृषिभूषण डॉ. दत्तात्रेय वने यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव जयंत वने, ग्रीनअप शेतकरी कंपनीचे कार्यकारी संचालक सचिन ठुबे, कृषिभूषण राहुल रसाळ, ‘अॅग्रोवन’चे बातमीदार सूर्यकांत नेटके यांचा या वेळी पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. प्रा. अक्षय अंबाडे, आकाश गोटीपामुल, अभिजित भालेराव, शिवाजी तुले, मनीषा सानप उपस्थित होते. कृष्णा बेलगावकर यांनी प्रस्ताविक केले. विना दिघे यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com