Onion Market News साक्री : शेतकऱ्यांच्या कांद्याला रास्त भाव (Onion Rate) मिळावा व प्रतिक्विंटल पंधराशे रुपये अनुदान (Onion Subsidy) राज्य सरकारने द्यावे, तसेच २०१८ वर्षांत तालुक्यातील शेतकऱ्यांचे गारपीट नुकसानीच्या पंचनाम्यांच्या (Hailstorms Damage) ९७ कोटी रुपयांच्या नुकसानीचे अनुदान (Crop Damage Compensation) त्वरित द्यावे या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे शुक्रवारी (ता. ३) तहसील कार्यालयाजवळ धरणे आंदोलन, तसेच काही काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या वेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना देण्यात आले. आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
सध्या कांद्याच्या दरावरून सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये असंतोष असताना या विषयावर शुक्रवारी महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले. या वेळी देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा ः कांदा उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड हवालदिल असून, कवडीमोलाने कांद्याची विक्री होत
आहे. अशा वेळी राज्य शासनाने केंद्र सरकारशी संवाद साधत निर्यातबंदी उठवावी व कांद्याला किमान तीन हजार रुपये भाव मिळवून द्यावा. तसेच राज्य शासनाने पंधराशे रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी प्रामुख्याने यात करण्यात आली.
यासोबतच २०१८ या वर्षात तालुक्यात झालेल्या गापीटीत रब्बी पिकांच्या ९७ कोटी रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे झाले होते. पाच वर्षांपासून या अनुदानाची मागणी करण्यात येत असून, अद्याप मिळालेले नाही. अशा वेळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अनुदान वितरित करण्यात यावे.
यावर वेळीच निर्णय न झाल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील निवेदनातून महाविकास आघाडीतर्फे देण्यात आला. आंदोलनात माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार डी. एस. अहिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव देसले, पंचायत समिती सभापती शांताराम कुवर आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.