Jaggery Market : गुऱ्हाळासंबंधी २८ लाख ७५ हजारांची फसवणूक

शेतकरी हनुमंत थोरात यांनी फिर्याद दिल्यानुसार, त्यांचे स्वतःचे गुऱ्हाळ असून हे गुऱ्हाळ महंमदवाडी (पुणे) येथील अनमोल मित्तल यांना चालवायला दिले होते.
Jagegry Market
Jagegry MarketAgrowon

केडगाव, ता. दौंड ः येथे गुऱ्हाळ चालकाने (Jaggery Production) उसाचे पैसे, ट्रॅक्टर भाडे, जागा भाडे न देणे आणि टोळी मुकादमाने शेतकऱ्याला (Jaggery Farmer) मजुरांची टोळी न देता उचल पैशांचा अपहार (Jaggery Fraud) करणे असे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या बाबत यवत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही गुन्ह्यांत एकूण २८ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.

Jagegry Market
Jaggery Market : ‘सौदे बंद’चा पोरखेळ थांबवा

शेतकरी हनुमंत थोरात यांनी फिर्याद दिल्यानुसार, त्यांचे स्वतःचे गुऱ्हाळ असून हे गुऱ्हाळ महंमदवाडी (पुणे) येथील अनमोल मित्तल यांना चालवायला दिले होते. या गुऱ्हाळावर थोरात स्वतःच्या ट्रॅक्टरने ऊस पुरवठा करत होते.

Jagegry Market
Healthy jaggery : आरोग्यवर्धक गुळाचे फायदे जाणून घ्या

गुऱ्हाळात टाकलेला ऊस व गुऱ्हाळाच्या भाड्यापोटी थोरात यांना मित्तल यांच्याकडून १३ लाख ७५ हजार रुपये येणे होते. या रकमेचे तीन धनादेश एक एक महिन्याच्या अंतराने मित्तल यांनी थोरात यांना दिले होते.

तीनही धनादेश न वटल्याने थोरात यांनी त्यांच्या विरोधात यवत पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. यवत पोलिसांनी मित्तल व त्यांचा मुलगा अनुकूल मित्तल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मामा-भाच्याने घातला गंडा

केडगाव येथील ऋषिकेश गणपत शेळके यांना मामा-भाच्याने १५ लाख रुपयांना गंडा घातला आहे. शेळके यांचे केडगाव येथे उसाचे गुऱ्हाळ आहे. शेळके यांना ऊसतोडणी मजूर पुरवण्यासाठी सुरेश बाजीराव भोईटे (रा. रोकडे, ता. चाळीसगाव) व त्याचा मामा विजय कुंडलिक पवार ( रा. खोपोडी, ता. दौंड, जि. पुणे) यांनी दोन टप्प्यात रोख व ऑनलाइन पद्धतीने एकूण १५ लाख रुपये शेळके यांच्याकडून घेतले.

बदल्यात मजूर पुरवले नाहीत. एकूण १६ मजूर पुरवण्यासाठी ही रक्कम स्वीकारली होती. अनेक प्रयत्न करूनही मजूर किंवा उचल पैसे परत न मिळाल्याने ऋषिकेश शेळके यांनी भोईटे व पवार यांच्या विरोधात यवत पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com