

Pune News : केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना (Government Scheme) शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी किसान मोर्चाच्या (KIsan Morcha) वतीने राज्यात ४ हजार किसान विस्तारक नेमले जाणार आहेत, अशी माहिती भाजप किसान मोर्चाचे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय थोरात यांनी दिली.
पुणे जिल्हा भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी मंचर (ता. आंबेगाव) येथे आयोजित केलेल्या बैठकीप्रसंगी ही माहिती दिली. यावेळी भाजपचे संघटक सरचिटणीस माऊली शेळके, ज्येष्ठ नेते रवींद्र त्रिवेदी, किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नवनाथ थोरात, अंकुश गवळी, संतोष शेलार, शरद चौधरी, नानासाहेब गवळी, दत्तात्रय मळेकर, प्रकाश देसाई, रामदास रोडे, विठ्ठल कोऱ्हाळे, योगेश गवळी, संदीप जाधव यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, की केंद्र आणि राज्य सरकारच्या नावीन्यपूर्ण लोककल्याणकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरामध्ये चार हजार किसान मोर्चा विस्तारक नेमले जाणार आहेत.
या अभियानाद्वारे पुणे जिल्ह्यामध्ये १०० किसान मोर्चा विस्तारक नेमले जाणार असून, नमो महासन्मान किसान निधी योजना, फक्त एक रुपयांमध्ये पंतप्रधान पीक विमा योजना, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान, आरोग्यासाठी आयुष्यमान भारत, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल अनुदान, महाडीबीटीद्वारे मागेल त्याला शेततळे, अस्तरीकरण, शेडनेट, हरितग्रह, शेतीसाठी यांत्रिक अवजारे अनुदान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रतिव्यक्ती प्रतिवर्षी १८०० रुपये अनुदान आदी योजना राबविणार आहेत.
पंतप्रधान पीक विमा योजना किसान मोर्चा राबवणार तसेच आंबेगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांना कोणती अडचण असल्यास त्यांनी भाजप किसान मोर्चा जनसंपर्क कार्यालय, मंचर येथे भेट द्यावी.
- नवनाथ थोरात, जिल्हा सरचिटणीस, भाजप किसान मोर्चा, पुणे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.