Grape Orchard Damage
Grape Orchard DamageAgrowon

Vineyard Damage : अनगर येथे वावटळीने चार एकर द्राक्षबाग जमीनदोस्त

वादळामुळे बेदाणा शेडवरील शेडनेट, पॉलिहाउसवरील कागदही फाटले आहेत. याबाबत त्यांनी मोहोळच्या तहसीलदारांना भेटून नुकसान भरपाईसाठी अर्ज दिला आहे.

Vineyard Damage अनगर : येथील शेतकरी बाबासाहेब वासुदेव गुंड यांची तोडणीस आलेली गट नंबर १३८ व १३९ या क्षेत्रावरील चार एकर द्राक्षबाग (Vineyard) अचानक आलेल्या नैसर्गिक वावटळ-वादळाने (Natural whirlwind) फाउंडेशनसह जमीनदोस्त झाल्याने त्यांचे ६० लाख रुपयांचे नुकसान (Vineyard Damage) झाले आहे. .

सोमवारी (ता. २०) सायंकाळी चारच्या सुमारास सगळीकडे वातावरण शांत असताना, अचानक मोठ्या प्रमाणात वावटळ उठून मोठे वादळ आले

आणि बघता बघता आमच्या डोळ्यादेखत घडांनी भरगच्च भरलेली द्राक्षबाग लोखंडी अँगलच्या फाउंडेशनसह जमीनदोस्त झाल्याने हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने अशा रीतीने हिरावल्याचे शेतकरी बाबासाहेब गुंड यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितले.

द्राक्षबाग व फाउंडेशनच्या खर्चासह ६० लाख रुपयांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

Grape Orchard Damage
Vineyard Management : वाढत्या तापमानामुळे उद्‍भविणाऱ्या समस्या

वादळामुळे बेदाणा शेडवरील शेडनेट, पॉलिहाउसवरील कागदही फाटले आहेत. याबाबत त्यांनी मोहोळच्या तहसीलदारांना भेटून नुकसान भरपाईसाठी अर्ज दिला आहे.

अशी घटना अनगर परिसरात पहिल्यांदाच घडल्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी जमीनदोस्त झालेली द्राक्षबाग बघण्यासाठी गर्दी केली होती. याप्रसंगी वासुदेव गुंड, माजी सरपंच अंकुश गुंड, चंद्रहार थिटे, सचिन कदम, श्री. थोरात आदींसह शेतकरी उपस्थित होते.

मोठ्या कष्टाने व मोठा खर्च करून उभारलेली द्राक्षबाग पंधरा दिवसात तोडायला येणार होती. येणाऱ्या उत्पन्नातून पुढील आर्थिक तरतूद केली होती. परंतु या अचानकच्या वावटळ- वादळाने सर्वच कोलमडले आहे. जेवढे नुकसान झाले आहे, तेवढे मिळण्याची अपेक्षा आहे.

- बाबासाहेब गुंड, शेतकरी, अनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com