Harshvardhan Jadhav : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका, व्हिडीओच्या माध्यमातून दिली माहिती

MLA Harshvardhan Jadhav : शिवसेना, मनसे या पक्षांमध्ये काम केल्यानंतर जाधव यांनी हल्लीच तेलंगाणातील के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला होता.
Harshvardhan Jadhav
Harshvardhan JadhavAgrowon

Maharashtra News : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना आज (ता.२४) हृदयविकाराचा सौम्य झटका आला. जाधव हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी अचानक जाधव यांच्या छातीत दुखू अन् अस्वस्थ वाटू लागले.

यावेळी समयसूचकता दाखवत गडकरींच्या निवासस्थानी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी जाधव यांना तात्काळ जवळच असलेल्या आरएमएल रुग्णालयात दाखल केले. दरम्यान जाधव यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

जाधव हे कामानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतल्या सरकारी निवासस्थानी गेले होते. तिथेच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवसेना, मनसे या पक्षांमध्ये काम केल्यानंतर जाधव यांनी हल्लीच तेलंगाणातील के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला होता.

हर्षवर्धन जाधव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून प्रकृतीची माहिती दिली आहे.

Harshvardhan Jadhav
Nana Patole : 'सरकारवर शेतकरी, गरिब जनतेचा विश्वासच राहिला नाही'

यामध्ये त्यांनी मला बहुतेक हृदयविकाराचा झटका आला आहे. नितीन गडकरी यांच्या घरी असताना मला हृदयविकाराचा झटका आला. आता मला रुग्णालयात घेऊन जात आहेत. माझी आधी अँजियोप्लास्टी झालेली आहे. भारत माता की जय, देशाची काळजी घ्या, महाराष्ट्राची काळजी घ्या. कन्नड मतदारसंघाची काळजी घ्या. वाचलो तर पुन्हा भेटू, असे आवाहन त्यांनी या व्हिडीओतून केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com