Isro : इस्रोच्या अंतराळ धोरणासाठी हवी राजकीय इच्छाशक्ती

अध्यक्ष एस. सोमनाथ ः या वर्षांच्या शेवटी अनमॅन्ड मिशन
 ISRO
ISROAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर ः अंतराळ कार्यक्रम आणि योजनांमध्ये खासगी संस्थांचा सहभाग, त्यांची जबाबदारी निश्चित करणे, विविध योजना आणि कार्यक्रमांमधील भूमिका, तसेच देशाच्या विकासात स्पेस

तंत्रज्ञानाचा वापर यावर आधारित नवे अंतराळ धोरण तयार झाल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी बुधवारी (ता. ४) येथे पत्रकार परिषदेत दिली.

 ISRO
कृषी शिक्षणाच्या नवीन  धोरणासाठी समिती स्थापन

१०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी आयोजित सत्रानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. एस. सोमनाथ म्हणाले, की गेल्या ६० वर्षांमध्ये इस्रोने अंतराळात मोठी प्रगती केली आहे.

आता त्यात खासगी संस्थांची भागीदारी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, हे करीत असताना, काही कायदे, काही जबाबदाऱ्या आणि निश्चित धोरण ठरवावे लागणार आहे.

त्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. तो मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. येत्या एक ते दोन दिवसांत त्याला मान्यता मिळण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

 ISRO
दुर्दम्य इच्छाशक्ती, अविरत परिश्रमांतून त्याने जिंकले संकटांना

गगणयान हे मानवरहित (अनमॅन्ड मिशन) यान या वर्षीच्या शेवटी अंतराळात पाठविण्यावर भर आहे. साधारणतः गगणयानसाठी दहा वर्षाचा कालावधी लागत असून भारताने ते चार वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य हातात घेतले आहे.

त्यासाठी चार चाचण्या घेण्यात येणार असून त्यापैकी दोन चाचण्या सध्या हाती घेण्यात आलेल्या आहे. त्यातही एक मानवरहित तर एक अंतराळवीरासह पूर्ण केली जाणार आहे. मात्र, म्हणजे मानवरहित यान असल्याने त्याबाबत सावधगिरीने पुढे जात आहे.

त्यासाठी रशिया आणि अमेरिकेतील तंत्रज्ञानाचीही मदत घेण्यात येत असून वातावरण नियंत्रण आणि जीवनरक्षक व्यवस्थाही तपासण्यात येत आहे. त्यामुळे ते थोडे खर्चिक असल्याचे ते म्हणाले.

चांद्रयान -३ तयार मंगळ यानाची घोषणा एका महिन्यात


चांद्रयान -३ तयार असून यापूर्वी २ प्रमाणे आमच्या अपेक्षा सारख्या आहेत. गेल्यावेळी ज्याप्रमाणे चुका झाल्यात.

त्या टाळून स्पेस लॅन्डींग आणि रोटर बाहेर निघावे याकडे व विशेष भर देण्यात येणार आहे. त्यामुळे जून-जुलैमध्ये ते सोडणार असल्याचे एस.

सोमनाथ म्हणाले, मंगळ यानाची घोषणा एका महिन्यात होणार आहे. मात्र, शुक्रयान-१ मिशन हा विषय सध्या संकल्पेपुरता असून त्याबाबत दोन समित्या तयार करण्यात आल्या आहेत. त्या सरकारसमोर आपले तथ्य मांडतील.

दुसऱ्या प्रक्षेपण स्थानकासाठी जमीन अधिग्रहण लवकरच
तमिळनाडू येथे सुरू करण्यात येणाऱ्या दुसऱ्या प्रक्षेपण स्थानकासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून उभारणीसाठीचा संपूर्ण आराखडा तयार असल्याचीही माहिती एस. सोमनाथ यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com